जगभरातील भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताला नैसर्गिक सौंदर्याची भूमी म्हटले जाते.
२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा होतो. मात्र, २५ जानेवारी हा राष्ट्रीय पर्यटन दिवस त्या प्रमाणावर साजरा होताना दिसत नाही.
जगभरात २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन साजरा केला जात असला तरी भारतात आपला पर्यटन दिवस २५ जानेवारीला साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात १९४८ मध्ये झाली, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन परिवहन समितीची स्थापना करण्यात आली.
तीन वर्षांनंतर, म्हणजे १९५१ मध्ये दिल्ली, मुंबई व्यतिरिक्त कोलकाता आणि चेन्नई येथे पर्यटन कार्यालये सुरू करण्यात आली. वर्ष १९९८ मध्ये, पर्यटन आणि दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत पर्यटन विभाग जोडण्यात आला.
या वर्षाची राष्ट्रीय पर्यटन दिवस २०२२ ची थीम “आझादी का अमृत महोत्सव” ही आहे. २०२१ च्या राष्ट्रीय पर्यटन दिवसाची थीम ‘देखो अपना देश’ अशी होती.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply