राष्ट्रीय व्होडका दिवस दरवर्षी ४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
व्होडका हे मूळचे रशियन मद्य. व्होडकाला स्वत:ची अशी चव नाही. तो ज्या पेयात मिसळाल त्यात बुडून जातो आणि ती त्याची चव बनून जाते. व्होडका हा पूर्वी कधी काळी औषध म्हणून वापरला जात होता, असं काही जणांनी लिहून ठेवलंय. व्होडकात अगदी कमी प्रमाणात म्हणजे १४ टक्के अल्कोहोल असतं. साधारण आठव्या शतकात व्होडकाचा उगम झाला आणि त्याच्या निर्मितीला रशियात सुरुवात झाली. आजच्या घडीला रशियात जितकी दारू प्यायली जाते. त्यापैकी ७० टक्के व्होडका प्यायला जातो.व्होडका हा मुखशुद्धी म्हणून वापरता येतो, हे लक्षात ठेवा. कारण यातील अल्कोहोलचे प्रमाण तोंडातील अतिसेवनामुळे निर्माण झालेले जिवाणू मारून टाकते. त्यामुळे मुखाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. म्हणजे र्निजतुकीकरणात व्होडकाचा वाटा मोठा आहे.
काही जण पूर्वी जखमेवर व्होडकाचा वापर करायचे. व्होडका प्यायल्याने चरबी वाढण्याचाही धोका संभवत नाही.पारंपरिक व्होडका गहू, राय, मका, बटाटे, बीट इत्यादींपैकी कोणत्याही स्वस्त व मुबलक असणार्या. पदार्थांचे किण्वन (ही एक रासायनिक प्रकिया आंबवणे किंवा कुजणे असे म्हणतात.) केल्याने मिळणाऱ्या बिअरचे ऊर्ध्वपातन करून व लोणारी कोळशाच्या थरातून गाळल्यावर ऊर्ध्वपातित जलाने विरल (सौम्य) करून ती बनविली जाते. पण आता अमेरिकेतील टॉड कोच या शेतकऱ्याने दूध पासून व्होडका बनवण्यास सुरुवात केली आहे. उत्तर अमेरिकेमध्ये दुधाच्या निवळी आंबवून त्याचे डिस्टिलेशन केल्यानंतर तयार केलेली व्होडका लोकप्रिय होत आहे.
ओरेगॉन राज्यातील टॉड कोच यांचे कुटुंब गेल्या वीस वर्षापासून २० गायींचे पालन करतात. या गायींपासून उपलब्ध होणाऱ्या दुधापासून विविध उत्पादन तयार करतात. त्याची डेअरी टीएमके क्रिमरी ही २०१७ पासून चीज उत्पादन करत आहे. यातून सध्या वाया जाणाऱ्या निवळीपासून व्होडका तयार केला आहे. या व्होडकाचा काऊकोहोल हा ब्रॅंड विकसित केला आहे.
व्होडका प्रेमींना व्होडका दिनाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply