दही-दुध खातो
खोड्याही करतो
जीव माझा थकतो
तरी किती पळवतो।।
नटखट कान्हा येतो
मुरली ही वाजवतो
वेडं मला करितो
यमुनाजळी लपतो।।
पाठी पाठी धावतो
लिला किती दावतो
राधेला भुलवितो
मिरेला पावतो।।
भक्तांना तारतो
दुष्टांना मारतो
गीता ही वदतो
अवतार संपवितो।।
घरोघरी राहतो
यशोदेसी रिझवतो
बिंबात प्रतिबिंबतो
जीवा मोक्षही देतो।।
भजनात दंगतो
भक्तीत रंगतो
महिमा तुझा सांगतो
भक्त तल्लीन होतो।।
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply