- थायरॉइड इतका सामान्य आहे की 10 पैकी एका स्त्रीला असतो. बर्याच स्त्रिया याकडे दुर्लक्ष करतात कारण सबक्लिनिकल (TSH<10) स्टेज मध्ये याची जास्त लक्षणे दिसून येत नाहीत. थायरॉईड हे प्रजनन वयातील स्त्रियांमध्ये वंध्यत्व (Infertility) च एक प्रमुख कारण आहे त्यामूळे ह्यावर उपचार घेणे आवश्यक आहे.
- थायरॉइड संप्रेरक प्रसूति च्या पाहिल्या तीन महिन्यात आई च्या शरीरात कमी असल्यास त्याचा परिणाम बाळाच्या मेंदूच्या वाढीवर आणि आय क्यू (IQ) किंवा बुद्धिमत्ता कोक्षणावर होतो. बाळ मतिमंद होण्याची शक्यता वाढते.
आता मूळ प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी थोडी प्राथमिक माहिती समजून घेणं जरूरी आहे.
थोडक्यात सांगतो.थायरॉइड नावाची ग्रंथी गळ्यात असते फुलपाखराच्या आकाराची अणि ती ‘टी3’ व ‘टी4 ‘ अशा नावाची दोन हार्मोन्स किंवा संप्रेरके बनवते. आता या दोन हॉर्मोनचे रिसेप्टर्स (receptors) शरीरातील बहुतांश अवयवांवर असतात. या हार्मोन्सचे प्रमुख काम आहे की, आपल्या खाण्यातून आलेल्या ऊर्जेचा वाटप करण्याचे प्रमाण (BMR कंट्रोल) नियंत्रणात ठेवणे (चयापचय क्रिया नियंत्रण).
असं समजा की, एखाद्या गाडीत जसं एक्सेलटर काम करतं तसं ही हार्मोन्स काम करतात. म्हणजे एक्सेलेटर जास्त झाली की गाडी जोरात पळते आणि कमी झाली की गाडी संथ होते.
अगदी तसेच टी 3 टी 4 जास्त झाल की हायपरथायरोडिझम (hyperthyroidism) म्हणजे हृदय हे ठोके वाढणे (धड धड), हाता पायाला कपकपी (tremors), वजन कमी होणे, जुलाब इत्यादी.
आणि टी 3 टी 4 कमी झाले की हायपोथायरोडिझम (hypothyroidism) म्हणजे वजन वाढणे, केस गळणे, सूज येणे, पोट साफ न होणे, थकावट, अंग दुखी, कमज़ोरी, उदासीनता, महीना पुढे जाणे इत्यादी. हा प्रकार खूप जास्त सामान्य (कॉमन) आहे.
हे झाले टी 3 आणि टी 4 कमी जास्त झाले की पण आता लक्षात घ्या की ही थायरॉइड ग्रंथी ही पिट्युटॅरी (pituitary) ग्रंथीच्या नियंत्रणाखाली असते.ही pituitary ग्रंथी थायरोड स्टीमयूलेटिंग हॉर्मोन अथवा टी एस एच (TSH) बनवते अणि ह्याची मात्रा टी 3 टी 4 च नियंत्रण करते.जेव्हा टी 3 टी 4 कमी होते तेव्हा (टी एस एच) वाढते जेणेकरुन ग्रंथी ला चालना मिळेल.
आता मूळ उत्तराकडे येतो.टी 3 आनि टी 4 हार्मोन्स ही आयोडीनने बनतात.जेवणात आयोडीन फक्त दोन गोष्टीतून मिळते आणि ते म्हणजे टाटा मीठ म्हणजे आयोडीन युक्त मीठ (iodine fortified salt) आणि दुसरे म्हणजे जी गोष्ट समुद्रातून येते म्हणजे मासे.
(याशिवाय आयोडीन काही कफ सिरप, MRI CT स्कॅन चि कॉन्ट्रॅस्ट (contrast) डाय, हृदयविकार याच्या गोळ्या amiodarone यात देखील असते) आयोडीन हा मूळ घटक आहे ज्याने थायरोड हार्मोन्स बनतात म्हणजे आपल्याला जेवणात तेच पुरेश्या मात्रेत घेणे गरजेचे आहे.
याचा अर्थ जास्त मीठ खा असा मुळीच नाही. आपण नेहमीच्या आहारात जेवढे मीठ घेतो ते पुरेसे आहे. मासे खाणे आरोग्याला चांगले आहे.
अगोदर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या बहुतांश भारतीयांना गोयटर (goiter) म्हणजे गळा मोठा असणे कॉमन होते. कारण भारतीय मातीत आयोडीन चि कमतरता होती म्हणूनच सरकारने मीठात आयोडीन घालणे बंधनकारक केले.
तुम्ही बर्याचदा इंटरनेट वर वाचलं असेल की सोयाबीन, ब्रूसेल्स मोड़, पालक, गोबी वगैर वगैरे खाण्याने थायरोइड होतो. मुळात ह्या सर्व गोष्टी रक्तातून आयोडीन पकडतात आणि ग्रंथी पर्यंत जाऊ देत नाहीत. परंतु हे प्रमाण फार कमी असत आणि योग्य प्रमाणात जेवणात आयोडीन असेल तर ह्याचा काहीच परिणाम दिसुन येत नाही.
शिवाय सोयाबीन वगैरे गोष्टी शरीराला आवश्यक असतात आणि आयोडीन ब्लॉक करण्यासाठी ह्यांची लागणारी मात्रा खूपच जास्त आहे जी नेहमीच्या जेवणातून पोहोचू शकत नाही. त्यामुळे ते खाणं टाळू नये व आहारात यांचा समावेश असावा.
तुम्हाला जर माझा लेख आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.अशाच प्रकारच्या नवीन माहिती साठी ब्लॉग ला बुकमार्क करून ठेवा.
धन्यवाद
जय हिंद जय महाराष्ट्र
डॉ निखिल प्रभु
मधुमेह स्पेशलिस्ट मुंबई
Leave a Reply