|| हरी ॐ ||
<निसर्ग
निसर्गाशी घेऊ नका पंगा,
भविष्यात करील आपला वांधा,
निसर्गाशी ठेवा सख्य,
करण्या सर्व कष्ट सुसह्य !
निसर्गाशी केलीत जवळीक,
होतील सर्व ऋतू सकळीक !
माणसे माणसांसारखी वागली,
तर ऋतूही आनंदाने बहरतील !
ऋतू हसले निसर्ग डोलू लागेल,
ऋतू रडले निसर्ग काळवंडले,
ऋतू हसला पिकं डोलू लागली,
ऋतू चिडला, पिकांनी मान टाकली !
ऋतूंशी केली गट्टी, ऋतू हसवती,
ऋतूंशी केली कट्टी, ऋतू रडवती !
ऋतूंशी वागणे सन्मानाने,
ऋतूंचे देणे अमर्यादेने !
माणसांचे निसर्गाशी सख्य,
ऋतूंच्या चेहेऱ्यावर खिलते सदैव हास्य !
<जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply