नवीन लेखन...

निसर्गोपचारतज्ज्ञ नेहमीच डॉक्टर नसतात…

निसर्गोपचाराचा साडे पाच वर्षांचा पूर्ण वेळाचा अभ्यासक्रम शासनमान्यता प्राप्त महाविद्यालयांत शिकून BYNS (Bachelor of Naturopathy and Yogic Sciences) ही पदवी घेतलेली व्यक्तीच आपल्या नावापुढे ‘डॉक्टर’ अशी उपाधी लावू शकते. घरबसल्या डिप्लोमा केलेल्या व्यक्ती स्वतःला डॉक्टर म्हणवू शकत नाहीत; असे स्पष्ट निर्देश मा. सर्वोच्च न्यायालयाने तसेच भारतीय चिकित्सा शास्त्रांच्या केंद्रीय नियामक समितीने (CCIM) वेळोवेळी जाहीर केलेले आहेत.

याशिवाय कायद्यानुसार; स्वतःला निसर्गोपचारतज्ज्ञ म्हणवणाऱ्या व्यक्तीकडे आयुर्वेदाची BAMS ही पदवी नसल्यास ती व्यक्ती रुग्णांना कोणतेही आयुर्वेदीय औषध वा पंचकर्म इत्यादि देऊ शकत नाही. आपण ज्यांच्याकडून असे उपचार घेत आहात त्यांच्याबद्दल वरील मुद्द्यांबाबत खात्री करून घ्या.

सजग रहा; आपल्या आरोग्याशी खेळ करू नका!!

टीप: गेले अनेक दिवस अध्यात्म ते निसर्गोपचार अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती स्वतःला वैद्यकीय चिकित्सक असल्याचे भासवून लोकांना आयुर्वेदीय उपचार देतो असे सांगत असल्याच्या घटना वाढल्याचे लक्षात आले असून; ‘याबाबत तुम्ही सत्यस्थिती सांगा’ अशी विचारणा वाचकांकडून होत असल्यानेच हा लेखनप्रपंच

– वैद्य परीक्षित शेवडे

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..