नवीन लेखन...

नऊवारी एअर होस्टेस

पुणे दुबई फ्लाईटनी एकदाच टेक ऑफ घेतल आणि आपण अडीच पावणे तीन तासात दुबईत पोहोचु या माझ्या समजाला खुद्द पायलटच्या आनौन्समेंटनी दुजोरा दिला आणि पाठोपाठ फेअर इंडीयाच्या नउ वारीतल्या एअर होस्टेसनीही पाठींबा जाहीर केला. थोड स्थिर स्थावर झाल्यावर एअर होस्टेसेसनी सुरक्षा व्यवस्थेसंबंधीच्या नेहमीच्या कवायती चालु केल्या. नउवारीतल्या एअर होस्टेसेस बघण्यापेक्षा बोर्डिंग पासप्रमाणे अँलॉट झालेल्या आयल सीटवर डोळे मिटून डुलकी काढायचा निर्णय मी स्वतःवर लादला.

बाईंनी माईकवर जाहीर केल “सर्व अलौंन्समेंट म्हराटित होतील तवा समद्यांनी हित ध्यान द्यायाचय. पुन्ह्यांदा सांगन होनार न्हाई. डोईवरच प्यँनल घट लावा नाहीतर तुमच्या बँगा खाली घरंगळतील आनी कुनाची पन टकुर फुटतील. ” माझ्या प्रमाणे ईतरही उठले आणि भितीपोटी पँनल घट्ट बंद असल्याची खात्री करुन घेतली.

त्यानंतर चिंचोळ्या पँसेजमधुन खाण्यापिण्याची ट्रॉली फीरवण्यापूर्वी बाईनी मराठीत दुसरी आनौंन्समेंट ठोकली. ” खायाला दशम्या, खेकडा भजी भेटतील आनि च्या काफी बुडवायची हवी असेन ते आदुगर सांगाया पाहिंजेलय. उपासवाल्यांना साबुदाना लापशीबी बनवली हाय. कोल्डिंकमदी फकस्त गोटी सोडा भेटल आनि कोनाला हवा आसेन तर रंगीत बरफ गोला पन भेटल”. माझी अन्न पाण्यावरची ईच्छाच उडाली.

दोन्ही दिशानी दोन ट्रॉली सुटल्या. आयल सीटमुळे सहाजिकच डावीकडे किंचीत भर देउन उजवीकडे अंग चोरुन मी बसलो होतो. बाईंची ट्रॉली जवळ येताच “ग्लास अॉफ वॉटर प्लीज म्हटलो” आणि ओठांना अंगठा लावत त्या अर्थाची खुणही केली. ग्लासच्या देवाण घेवाणीत बाईंच कोपर माझ्या कोपराला लागल. उगाच चार चौघात बाईंच मी टू नको म्हणुन मीच बाईंना सॉरी म्हणलो. बाई म्हणल्या ” तुमी नव्ह मीच स्वारी. माझच ध्यान नवत. पन पानी पेला का न्हायी?” मी मी टू तुन वाचलो पण तू तू मै मै मधे अडकण्यापेक्षा बाईंची स्वारी कुबुल केली.

पलीकडच्या खिडकीतून तुरळक अंतरानी दुबईचे लायटींगवाले मनोरे दिसायला लागले. बाईंनी माईक हातात घेतला. “ईमान थांबल्याबिगर कोनीपन पट्टा सोडायचा न्हाई असा डायवरनी निरोप धाडलाय. तवा आपापल्या सीटावर पडुन र्हावा”

उतरताना हात जोडुन सर्व जणीनी एकमुखानी सांगितल ” ह्यो डायवर आनि आमी संगतीच असतोय. पाव्हण्यांना घेउन कवा पन या पुन्ह्यांदा.” मी सून्न होउन लँडरवरुन बसच्या दिशेनी आगेकूच केल.

— प्रकाश तांबे
8600478883

Avatar
About प्रकाश तांबे 45 Articles
मी प्रकाश तांबे, पुणे. गेले तीन-चार वर्षे मी वर्तमानपत्रे व सोशल मीडीयावर सातत्याने लिहित असतो. जाणकार वाचकांच्या प्रतिक्रीयेने मला नेहमीच स्फूर्ती मिळत असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..