या नांवाचा आग्रह केलेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहित नाही. महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याच्या या व्यक्तीचं नाव का दिलं माहित नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळची कागदपत्र काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही.
कवीचे पाय कधी जमिनीला लागत नाहीत. तो सतत स्वच्छंदपणे आपल्या कल्पनेच्या भराऱ्या मारीत आसमंतात विहार करत असतो. जेवेणा-खाण्याची वेळ साडली तर इतरवेळी आपल्याच तंद्रीत मग्न असतो.
बहुधा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांना आणि अधिकाऱ्याना याची कल्पना असावी. कारण कुणा रस्त्याला कुणाचं नाव द्याव, कोणत्या स्टेशनच नाव बदलावं, कुठल्या चौकाला चार नावं द्यावीत, कुठल्या रस्त्याचे दोन भाग पाडुन दोन टोकाला दोन विभूतींची स्मृती जागृत ठेवावी. यात मुंबई महानगरपालिकेचा हात धरणांर कुणी मिळेल असं वाटत नाही. लोकाना जी नावं परिचित आहेत ती बदलून नवीन नाव ठेवण्यात एक प्रकारचा असुरी आनंद या मंडळीना मिळत असावा. ब्रिटिश आले. त्यानी दिलेली नावं बदलली. ते समजू शकतो. पण त्यानंतर नाव बदलण्याचा जो सपाटा सुरु राहिला त्याला काही सुमारच नाही. बरं, एकाच व्यक्तीच नांव किती रस्त्याना, गल्ल्यांना, चौकांना, बगिच्यांना द्यायच यावरची काही बंधनं नाहीत. त्या भागातल्या लोकप्रतिनधीना वाटल अमुक एका राष्ट्रनेत्याच नांव आपल्या भागातील रस्त्याला असावं, तर ते दिल जात. पण त्यचा नेत्याचं नाव शहरातील इतर भागात, इतर उपनगरात दिले आहे याची आठवण प्रशासनालाही राहत नाही अािण लोकांनाही राहत नाही. त्याची नोंद फक्त पोस्टमनच घेत असावा. कारण नाहीतर केवळ घर नंबर आणि रस्त्याचं नाव लिहिल्यावर मुंबईत पत्र व्यवस्थित पोहोचत याला दुसर काहीच कारण असू शकत नाही.
नांव कुणाची द्यायची यालाही काही धरबंध नाही. काही नियम असतील. पण ते कागदावर राहतात. साधारणत: कर्तृत्ववान व्यक्तीचं नाव रस्त्याला देऊन त्याची स्मृती जागी ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या चाहत्यांनी केला, तर ते समजण्यासारखं असतं. चाहते नसले तर मुलं-मुली, नातेवाईक असतात आणि ते त्या व्यक्तीचं नाव पुढे चालू राहील यासाठी काम करतात. यशस्वी होतात. पण सध्या काही कर्तृत्ववान व्यक्तीचं नाव रस्त्याला देऊन त्याची स्मृती जागी ठेवण्याचा प्रयत्न त्याच्या चाहत्यानी केला तर ते समजण्यासारख असतं. चाहते नसले तर मुलं-मुली, नातेवाईक असतात आणि ते त्या व्यक्तीचं नाव पुढे चालू राहील यासाठी काम करतात. यशस्वी होतात. पण सध्या काही कर्तृत्ववान मंडळी आपल्या आई-वडिलांची, अकाली-मृत्यू पावलेल्या मुलाची किंवा मुलीची स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्या दबावाचा वापर करुन ही नांव रस्त्याला, चौकाला, कट्टयाला देण्याचा आग्रह धरतात. प्रशासनही नमते आणि इतर मंडळीसुध्दा हो-ला हो मिळवतात कारण त्यांनाी अशाच कुणाची तरी स्मृती जागृत ठेवायची असते. त्यामुळे अशी कधीच कुणीच न ऐकलेली नाव शहराच्या इतिहासात ठाण मांडून बसतात. मग अमुक एका रस्त्याच नाव अमुक एका व्यक्तीच्या नावे का दिल ते कुणालाही सांगता येत नाही.
नाना चौकात एक लहानसा रस्ता आहे. त्याच्या दुतर्फा फार तर चार इमारती, उभ्या आहेत आणि लांबी फार तर पंधरा फुट असेल. रस्त्याच्या तोंडावरच दोन्ही बाजूला पांढऱ्या रंगातील निळी पाटी दिमाखानं झळकते आहे. वर्षातून एकदा कुणीतरी त्यावर फुलांचा हारही चढवलेला रहिवाशांना आठवतो. या नावाचा आग्रह झालेला नगरसेवक आज हयात नाही. त्या रस्त्यावरच्या एकाही नागरिकाला ही व्यक्ती कोण माहीत नाही, महापालिकेच्या कचेरीत काम करणाऱ्या कुणालाही या रस्त्याला या व्यक्तीच नाव का दिल माहीत नाही. ज्यावेळी हा ठराव झाला त्यावेळीची कागदपत्रं काढून बघण्यात आली, पण त्यातही त्या व्यक्तीविषयी काहीच माहिती नाही. फक्त ठराव मांडणारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीच नाव दिल ती व्यक्ती यांच आडनाव एकच असल्यानं त्यांच्याशी संबंधित असावी असा बोध होतो.
गंमत अशी, की आता नवीन निवडून आलेल्या प्रतिनिधीला आपल्या भागात भगतसिंगाच नांव नाही याचा पत्ता लागला आहे आणि आपल्यात नाव नसलेला कुठला रस्ता, चौक किंवा बगिचा आहे काय याचा त्याने शोध घेतला, पण तो सापडला नाही. ज्याचा अर्थ बोध होत नाही अशा नावांच्या समर्थनार्थ पाच–दहा लोक का होईना आहेत, हे लक्षात आल्यावर एकच नाव त्याच्या डोळयापुढे आहे ते म्हणजे ज्या नावाविषयी कुणाला काही माहीत नाही आणि ते नाव बदलल तर का बदलल असं विचारायला कुणी पुढे येणार नाही. मग ते नाव बदलून भगतसिंगांचं नाव द्यायला काय हरकत आहे. आता त्याचा प्रश्न आणि भगतसिंग यांचा नावाला विरोध करणार कोण? त्याुळे रस्त्याचं नाव बदलून भगतसिंग याच नाव दिल जाईल हे निश्चित.
भिती एवढीच वाटते, की ब्रिटिशांच्या काळातील बहुतेक नाव गेली. चांगल झाल. अनेक पुतळे गेले ते सध्या कुठेतरी धूळ खात पडलेले आहेत. तशाच या नावाच्या पाटयाही कुठे तरी धूळ खात पडणार नाहीत कशावरुन? गावाची नांव इतिहासजमा होतात तिथं रस्त्यांच्या पाटयांच काय? पण नाव बदलण्याचा आपला छंद काही महापालिका सोडेल असं वाटत नाही.
एका कवीचं नाव एका उड्डाण पुलाला देण्याचा निर्णय जवळ जवळ झाला आहे. दादर स्टेशनबाहेच्या पुलाला केशवसुतांचे नाव देण्याचा घाट घालण्यत आला आहे. पण बिचारे केशवसुत, लंगडया पायाच्या बुटक्या पुलाला नाव देऊन त्याच्या उत्तुंग प्रतिमेला तोकडी पाडली जाणार नाही ना? ते काही असल तरी एक दिलासा असा, की हा पूल फुलबाजाराला लागून आहे. तिथ कवतिांचा सुगंध पसरल्याशिवाय राहणार नाही, असं अस समाधान मानू या.
– प्रकाश बाळ जोशी
आज दिनांक : २६ मे १९९४
Leave a Reply