या हो स्वागताला
उंबरठ्यासी बाराच्या
सरता येता जल्लोष झाला//१//
दिन उगवला
नभात प्रभा फाकल्या
संकल्पांचा क्षण उजळला//२//
कुनिती,अनिती
विस्मरणात गाडल्या
आल्या की प्रगती,सुनिती//३//
शंखनाद होता
हा परिस स्पर्श झाला
नाही मिळणार कुठे गोता//४//
गुलाबी,शराबी
नव वर्षाची पहाट
पहा नसेल कुठे खराबी
//५//
सकारात्मकता
असो विचारात सदा
वाढो विश्वातली आत्मियता//६//
— सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
Leave a Reply