नवीन लेखन...

दिशादर्शकं

आज कुठेही जायचं म्हटलं की आपण गुगलचा उपयोग करतो. परंतु , आपल्याला कधी असा प्रश्न पडलाय का ? पूर्वी लोक कशाचा उपयोग करून मार्ग शोधत असतील . यापूर्वी प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी लागणाऱ्या ‘ दिशादर्शका ‘ बद्दल माहिती देणारा हा लेख….

आपण जेव्हा प्रवास करतो, तेव्हा आपल्याला वाहना बरोबरच प्रवासामध्ये ‘ दिशादर्शकं ‘ अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असत . कारण आपण कुठे चाललो आहे, हे शोधण्यासाठी दिशादर्शकं हे अत्यंत उपयुक्त साधंण प्रवासासाठी लोक वापरत ‌. दिशादर्शकाला दुसरा शब्द ‘ नेव्हिगेशन ‘ सुद्धा आहे. या नेव्हिगेशन शब्दाचा इतिहास खूप रोमांचक आहे. नेव्हिगेशन हा शब्द लॅक्टिक शब्दापासून बनलाय. नेव्हिगेशन चा अर्थ बोट असा आहे.

आज जीपीएस हे आपल्याला मार्ग शोधण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत. कुठून कसं जायचं , पुढे कोणतं गाव आहे , आपण जातोय तो रस्ता बरोबर आहे का , अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जीपीएस मुळे मिळतात परंतु आज आपलं हे एक ‘ नेव्हिगेशन ‘ म्हणून मुख्य भूमिका पार पाडत आहे. कारण , आपण जीपीएसचा उपयोग मार्ग शोधण्यासाठी करतो.

सुरुवातीच्या काळात प्रवाशांकडे प्रवासासाठी कंपासही नव्हतं , त्यावेळी यांना अनेक अडथळे प्रवास करताना घ्यायचे. तेव्हा ते अनेक वेगवेगळ्या प्रकारे साधनांचा योग्य तो उपयोग करून प्रवास करायचे . सुरुवातीला दर्यावर्दी हे तेथील ठिकाणाच्या निसर्गा कसा आहे . त्याचा उपयोग करून तेथील ठिकाण ओळखत असे. दर्यावर्दी प्रवाशांसाठी पहिलं महत्त्वाचा साधन म्हणजे आकाशातील ग्रह , तारे असायचे . ग्रहताऱ्यांच्या खानाखुना वरून ते प्रवास करायचे . आकाशातील गोष्टींचा उपयोग करून पुढील डोंगरदऱ्यातून प्रवास करायचे. त्या ग्रहताऱ्यांच्यावरून तिथे कोणता परिसर आहे . याचा ते योग्यरीत्या अंदाज लावायचे . व त्यांचा प्रवास सुखकर करायचे. दर्यावर्दीसाठी दुसरा सोपा उपाय म्हणजे ते वाऱ्यांच्या मदतीने पुढे डोंगर आहे का , असे तर तो किती अंतरावर आहे , पुढे कोणते ठिकाण आहे हे , त्यांच्यावरून ते त्या परिसराचा अंदाज घ्यायचे . जे जे खलाशी अनेकदा त्या ठिकाणावरून गेले. त्यांना त्या ठिकाणाचा योग्य अंदाज यायचा.

हे दर्यावर्दी तिसऱ्या पद्धतीचा उपयोग करायचे तो म्हणजे पक्षांचा आधार. कुठल्याही प्रकारचा पक्षी असो, तो आपली सवय कधीच मोडत नाही . हे आपल्या सर्वांना माहीत आहे . याचाच फायदा दर्यावर्दी घ्यायचे. पक्ष्यांचा उपयोग करण्यासाठी काही दर्यावर्दी पक्षांचा सुद्धा सखोल अभ्यास करायचे , काही पक्षांचा वेळा ठरलेल्या असतात ते त्या वेळेतच अन्नाच्या शोधात निघतात. काही प्रकारचे पक्षी हे ठराविकच ठिकाणी असतात ते इतर ठिकाणी आढळत नाहीत. काही प्रकारचे पक्षी ठराविकच झाडांवर आपली घरटी बांधतात व ते तिथेच वास्तव्य करीत असतात . काही प्रकारचे पक्षी ठराविक दिवसांमध्ये स्थलांतरित होतात . इत्यादींचा अभ्यास दर्यावर्दी करायचे. व त्याच्या मदतीने आपला मार्ग शोधायचे. दर्यावर्दीची ही कल्पना किती वेगळी होती, पण त्याद्वारे दर्यावर्दींना मात्र आपण किती वेळ प्रवास करत आहोत. हे शोधन मात्र अवघड होऊन बसायचं. कारण, त्या वेळी कोणतीही घड्याळ उपलब्ध नव्हती. ते सूर्याच्या अंदाजावरून आपण किती वेळ प्रवास करत आहोत ; याबद्दल अंदाज घेत होतो.

त्यानंतरच्या काळात दिशा शोधण्यासाठी दर्यावर्दी कंपास म्हणजे होकायंत्राचा वापर साधारणपणे ९६० – १२७९ या काळात सांग साम्राज्याच्या काळात जलप्रवासात व्हायला सुरुवात झाली. समुद्र प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात दर्यावर्दी उत्तर दिशा शोधण्यासाठी ध्रुव मारल्याचा उपयोग करीत. त्यानंतर चुंबकाचा वापर करून होकायंत्र वापरात आले. अगदी शंभर वर्षांपूर्वीपर्यंत दिशादर्शकाची ती एकमेव पध्दत होती, पण या पध्दतीत काही उणिवा आहेत. शंभर वर्षांपूर्वी ‘जायरो कंपास’ हे जडत्वाच्या तत्वावर चालणारे उपकरण वापरात आले. हे एक दोन अंश इतक्या फरकाने दिशादर्शन करते.परंतु होकायंत्राचा शोध केव्हा लागला हे नक्की सांगता येत नसलं. तरी चीनमध्ये साधारणपणे ख्रिस्तपूर्व २१० मध्ये लोहचुंबकाचा वापर केला होता, हा दावा केला जातो. होकायंत्र ( कंपास )चा जरी शोध लागला असला तरी त्यात सुधारणा ही १३ -१४ व्या शतकात मेडिटेरिनियन समुद्रात व्यापारी बंदराच्या सोयीसाठी नकाशात काही प्रमाणात सुधारणा करण्यातआल्या . त्यानंतरच्या काळात युरोपमध्ये होकायंत्राच आगमन झाल . परंतु ह्या होकायंत्राला हवामानाचा कोणताही फरक पडू नये ; यासाठी अनेक सुधारणा त्या होकायंत्र मध्ये करण्यात आल्या होत्या.

त्यानंतरच्या काळात क्रोनोमीटर नावाच घड्याळ बनलं त्याचा उपयोग अनेक देशांनी केला. कारण त्याचा उपयोग जास्त होता . ह्या क्रोनोमीटर चा उपयोग रेखांश काढण्यासाठी करण्यात आला. आणि पहिला क्रोनोमीटरचा उपयोग सन १७३५ साली केला . त्याच घड्याळाच्या मदतीन १९ व्या शतकात जहाजावरही ह्याचा उपयोग करण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात सुद्धा सुधारणा होत होत माणसाने ‘सेक्सटांट ‘ शोधला जो सन १७२७ सली पहिल्यांदा रेखांश आणि अक्षांश मोजण्यासाठी उपयोग करण्यात आला. पूर्वी दिशादर्शक म्हणून याचा वापर करण्यात आला होता. परंतु , यामध्ये काहीसा बदल अमेरिकेच्या फिलिप वीप्स या नैदल अधिकाऱ्यांन सन‌ १८८९ – १९७९ मध्ये करून त्याच्या चूकीनवर उपास शोधला. आणि सेक्सटांट सेकंदाचाही वापर योग्य करून ; त्याचा वापर सोपा केला.

नंतरच्या शतकातही याचा वापर तर होतच होता . परंतु अचूक ठिकाण शोधण्यासाठी या दिशादर्शकाचा योग्य वापर होत नसे . यासाठी नकाशाचा उत्तम दिशादर्शक म्हणून वापर केला जाई. कारण, नकाशामुळे पुढे कोणते ठिकाण आहेत हे नकाशावरून कळत असे , तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल , आपण योग्य ठिकाणी चाललो आहोत ना, पुढे नदी आहे का ,अशा असंख्य गोष्टी बद्दल माहिती देणारा योग्य दिशादर्शक म्हणून काम करणारा म्हणजे ‘ नकाशे ‘ होय . जेव्हा नकाशे बनवले जातात. तेव्हा त्यातील अक्षांश व रेखांश यांना अत्यंत महत्त्व दिलं जातं.

त्यातही पुढील काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या . समुद्रात प्रवास करण्यासाठी व रस्त्यावर प्रवास करण्यासाठी वेगवेगळे नकाशे बनवत. त्यात सखोल ठिकाणे दिली जात. त्यामुळे दर्यावर्दीना प्रवास करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होई . रस्त्यावरील प्रवाशांसाठी प्रमुख नैसर्गिक स्थळे , गावांची नावे, शहरांची नावे , अशी अनेक माहिती नकाशामध्ये दिली जात. त्यामुळे मार्ग शोधण्यासाठी या नकाशांचा प्रवाशांना खूप फायदा होई . ह्याच नकाशाची सुरूवात चीनमध्ये साधारणपणे ख्रिस्तपूर्व ४ व्या शतकात सुरू झाली. हे नकाशे रेशमी कापडांवर किंवा लाकडी गोष्टींवर बनवली जात होते . नंतरच्या काळात ही बरेच बदल ह्या नकाशांमध्ये झाले . मुख्यत ; ४ व्या शतकात नकाशात नवीन बदल झाल्याने , अनेक दर्यावर्दी दूर दूर पर्यंत प्रवास करू लागले . कारण , या नकाशात अचूकता अधिक आली . प्रवास करताना मिळालेल्या माहिती लिखित नोंदणी स्वरूपात लिहीत व नंतर त्याचे पुस्तक बनवले व ते पुस्तक दर्यावर्दी साठी प्रवासात मार्गदर्शक बनायचे.

जसजसं कंपास , छपाईतंत्र , सेक्सटांट यांच्यामध्ये वेगवेगळे बदल व्हायला लागले. तसतस नकाशात बदल व अचूकपणा यायला सुरुवात झाली. मानवाने जशी दिशादर्शक योग्य करण्यासाठी कंपास , टेलिस्कोप , सेक्सटांट मध्ये सुधारणा केल्या त्यानंतर मानवाने ‘ सँड क्लॉक्स : पण शोधून काढलं.

‘ सँड क्लॉक्स ‘ याचा वापर प्रामुख्याने जहाजावर ही व्हायचा. पण इतर लोकांना सुद्धा याचा उपयोग लक्षात आल्यावर. त्यांनीही यांचा वापर करण्यासाठी सुरुवात केली . या ‘ सँड क्लॉक्स ‘ चा उपयोग प्रामुख्याने वेळ पाहण्यासाठी केला जातो. आपण किती वेळ प्रवास केलाय . याचा अंदाज बांधण्यासाठी दर्यावर्दी याचा उपयोग करायचे . १ सप्टेंबर १९४७ रोजी IST चा जन्म झाला. आणि याच्या वर अनेक वेळापत्रक लागू झाली . चेन्नईमधील मुख्य वेधशाळा ही मिर्जापुला हलवण्यात आली. आज संपूर्ण भारतभर ह्याच वेळापत्रका IST साठी याचाच वापर होतो आहे .

हल्ली ‘रिंग लेझर जायरो’ नामक प्रकाश लहरींचा वापर करून दिशा दर्शन करणारे उपकरण अंशाच्या शंभराव्या भागापर्यंत बिनचूक माहिती देते.या सगळ्याचा उपयोग माणसांने असंख्य पणे केलाय व त्याचा उपयोग तो कळतो आहे , आणि येणाऱ्या भविष्यातही त्याचा उपयोग करत राहील !

— अथर्व डोके.

www.vidnyandarpan.in.net

Avatar
About अथर्व डोके 16 Articles
लेखक हे विज्ञान दर्पण वरचे मुख्या लेखक आहेत. त्यांचे लेख विविध संकेतस्थळावरती आणि विविध अंकांमध्ये प्रकाशित होतात. लेखक हे विज्ञानातील विविध विषयावरती लिहितात. आपण लेखकाशी माध्यमाद्वारे संपर्क समजू शकता. मोबाईल क्रमांक - ७२७६१३३५११ ई-मेल - atharvadoke40@gamil.com संकेतस्थळ - vidnyandarpan.in.net

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..