12 जुलै 2004 (सोमवार)
आम्ही बाहेर आलो आणि डाव्या हाताने ऑफिस कडे चालायला लागलो. दोन्ही साईडला सुंदर कन्स्ट्रक्शन्स होते. तो पूर्ण एरिया कमर्शियल एरिया म्हणून ओळखला जातो. लेफ्ट साईडला सुरुवातीला मोठ्या मोठ्या ब्रँडची ब्रँड शॉप्स होती. मार्क्स & स्पेन्सर, ब्रूटस् वगैरे. दुसऱ्या बाजूला कोरियन एअर, इराण एअर, रशियन एअरची सुंदर मोठी ऑफिसेस होती.
थोडे पुढेच एक इटालियन कॉफी बार होते. बाहेर एक मोकळा रिकामा फुटपाथ होता. तिथे एक घोडेस्वारचा मेटलचा पुतळा होता. त्याच्या आजूबाजूला छान पैकी टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. लोकं त्या टेबल खुर्च्यांवर बसून ब्रेकफास्टचा आस्वाद घेत होते. समर सीजन असल्यामुळे या सीझनचा प्रत्येक क्षण ती लोक एन्जॉय करत होते. थंडीच्या दिवसात उघड्यावर बसून ब्रेकफास्ट करता येत नाही. त्यामुळे इथे आत्ता तरी पिकनिक सारखे वातावरण होते. मलाही अगदी मोह झाला की एक मस्त गरम कॉफी घेऊन ह्या प्रसन्न वातावरणात उघड्यावर पीत बसावे. पण ऑफिस खुणावत होते. मी ज्या कामासाठी आले होते ते अजून माझे सुरू झाले नव्हते. पण कधीतरी एक दिवस लवकर येऊन येथे कॉफी पीत बसेन, असा मनाशी निश्चय करून आम्ही पुढे निघालो.
आजूबाजूला सुंदर हॉटेल्स, रेस्टॉरंट होती. अधून मधून एखाद्या बिल्डींगवर रोमन आकडे असणारे मोठे घड्याळ होते. त्याचे काटे सोनेरी आणि डेकोरेटिव्ह होते. तासा-अर्ध्या तासाने त्यातून सुरेल धून निघत होती. वातावरण इतके आल्हाददायक होते, खूप थंडही नाही आणि मुळात घाम तर अजिबात नाही. उन होते पण त्याचा चटका अजिबात जाणवत नव्हता. अशा वातावरणात खरोखरीच पिकनिकचा मूड बनू शकतो.
पण मग मला माझ्या मनाला आवर घालावा लागला. मला ऑफिसमध्ये जाऊन काम समजावून घेऊन, काम करायचे होते. आता आम्ही ऑफिस बिल्डिंगच्या बाहेर उभे होतो. आत शिरण्यासाठी एक कोड फीड करावा लागतो. मग दरवाजा अनलॉक होतो. परेशने तो कोड फीड केला आणि मलाही सांगितलं.
दार उघडून आत गेल्यावर समोर पिस्ता रंगाची लिफ्ट होती. एकदम चकचकीत होती. आत मध्ये मोठे आरसे होते आणि प्रत्येक फ्लोअरवर अनाउन्समेंट होत होती. आम्ही थर्ड फ्लोअर ला गेलो. तिथेही दोन-तीन ऑफिसेस होती. आमच्या ऑफिस मध्ये एन्टर करायला परत एक कोड एन्टर करावा लागतो. तो कोड कसा वापरायचा याला एक वेगळी मेथड होती. ती मला तीन-चार दिवस कळलेच नाही. त्यामुळे मी पहिल्या दोन दिवसात तीनदा बाहेरच अडकले. कोणी तरी बाहेर आले किंवा आत जाण्यासाठी आले तेव्हा कुठे मला आत जाता आले.
ऑफिस अगदी टिपिकल ऑफिस होते.कमर्शिअल असल्यामुळे त्यांना कमीत कमी जागेत जास्त लोकांना बसवायचे होते. रेव्हपेक्षा हे थोडे कंजस्टेड वाटले. पण ते लंडनमधे असल्याने ते ही आवडले.
परेश बरोबर बसून त्याचे काम पाहिले. त्याने मला कॉफी मेकर, इतर काही ऑफिसमधल्या गोष्टी दाखवल्या. एक-दोघांच्या ओळखी करून दिल्या. तेवढ्यात आमचा प्रोजेक्ट मॅनेजर मार्टिन लेहमन आला. परेशने त्याच्याबरोबर ओळख करून दिली आणि नंतर आमच्या प्रोजेक्ट लीडर, नील पायनशी ओळख करून दिली. मग थोड्या फॉर्मलिटी कम्प्लिट झाल्या- ईमेल क्रिएशन, डेस्क अलोकेशन असे सर्व झाल्यावर मला काही डॉक्युमेंट्स वाचायला दिली.
दुपारी लंचसाठी मी घरून आणलेले मेथी पराठे घेतले होते. परेशने सांगितले, ऑफिस संपल्यावर आपण ग्रॉसरी शॉप मध्ये जाऊ. तिथे तुला काय हवे ते घेऊ. रेडिमेड पोळ्या, दूध घेता येईल, बाकी गोष्टी तर मी आणल्या होत्या.
मग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितलेमग तीन -चारच्या सुमारास प्रोजेक्ट लीडरने बोलावले. त्याच्या पुढचा डेस्क खाली होता. त्या कॉम्प्युटरवर त्याने एक इंटरफेस ओपन करून ठेवला होता आणि अगम्य भाषेत मला ते काम करायला सांगितले..
ती भाषा इंग्लिशच होती तरी मला ती अगम्य वाटली. कारण एक तर त्याचा टोन खूप वेगळा होता. प्रोनौन्सिएशन डिफरंट होते आणि तो फास्ट बोलत होता. बोलताना त्याची एक विचित्र सवय होती. तो डोळे मिचकावत व खांदे उडवत बोलायचा आणि त्याच्या या सवयीमुळे माझं लक्ष डिव्हाइड झाले आणि त्याने काय काम सांगितले हे माझ्या डोक्यावरून गेले. तो हसत हसत त्याच्या कामात गुंतला. मी माझ्या कॉम्प्युटर समोर पूर्ण ब्लँकचेहऱ्याने बसले. मला काही सुचेना. मी ऑलमोस्ट रडण्याच्या बेतात होते. पहिल्याच दिवशी माझी अशी अवस्था झाली. मी परेशकडे पाहिले. तो चार लाईन पलीकडे बसला होता. शेवटी मी कॉफी घ्यायला म्हणून उठले आणि परेशला कॉफी घ्यायला बोलावले. मला वाटले पहिल्याच दिवशी आपली इमेज खराब होणार.
मग मी परेशला वेगळ्या इंटरफेस बद्दल सांगितले. त्याने जस्ट एक हिंट दिली. त्याने सांगितले, हे VSS सारखेच आहे. मग माझी ट्यूब पेटली आणि मी पटापट काम संपवले. आमचा प्रोजेक्ट लीडर एकदम खुश झाला. त्याला आश्चर्य वाटले, एवढे फास्ट काम कसे झाले? त्याने दहा वेळा चेक केलं का असे विचारले पण! फायनली त्यानेही चेक केले आणि त्याची खात्री पटली. चला! पहिला दिवस तर निभावला गेला.
तिकडे चार-साडेचारला सर्वजण पॅक अप करतात. आम्हीपण काम संपवून निघालो. परेशने मला पिकॅडली स्टेशनला नेले, तिथे बाहेरच मोठे ग्रोसरी स्टोअर होते. तिथे आम्ही दूध, रेडीमेड पोळ्या (टॉर्टिला) आणि बटाटे असे जिन्नस घेऊन परत पिकॅडली स्टेशनला आलो. तिथून परेशला त्याच्या घरासाठी डायरेक्ट ट्रेन होती. त्याने, ‘आता तू एकटी घरी जाशील का?’ असे विचारले. मी हो म्हणून टाकले. मग तो निघून गेला.
मी शांतपणे ट्यूब मॅप बघितला मी कुठे आहे, कुठल्या लाईनने कुठे पोचू शकते हे सर्व डोक्यात ठेवून त्याप्रमाणे ‘लॅंकेस्टर गेट’ या स्टेशनला फायनली पोहचले.
एखादे युद्ध जिंकल्यासारखा मला आनंद झाला. आता मी एकदम कॉन्फिडन्टली कुठेही जाऊ शकेन याची खात्री पटली.
— यशश्री पाटील.
Leave a Reply