अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला ठसा उंटावताना अनेक ब्लॉक बस्टर हिट दिलेले आहेत. नवनीत कौर यांनी कन्नड़ चित्रपट दर्शन ने आपले करीयरची सूरवात केली. त्यांनी तेलुगु चित्रपट सीनू, वसंथी व लक्ष्मी, चेतना, जग्पथी, गुड बॉय, भूमा मध्ये अभिनय केला आहे.
नवनीत कौर यांनी मल्याळम चित्रपट लव इन सिंगापुर व पंजाबीतील लड़ गए पेंच मध्ये अभिनय केला आहे. नवनीत कौर २०११ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी अमरावती येथे विवाहबद्ध झाल्या. त्यांचा विवाहदेखील गाजला कारण त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केले. आमदार रवी राणा यांनी तीन हजार जोडप्यांसमवेत आपले लग्न केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याचा विवाह गिनीज बुकातदेखील नोंदवला गेलेला आहे. सातत्याने प्रकाशझोतात राहण्यासाठी भव्य सोहळे आयोजित करण्याची आमदार राणा यांची परंपरा राहिली आहे.
नवनित कौर राणा या चित्रपट तारका असल्याने त्यांच्या दहीहंडीच्या सोहळ्यात दरवर्षी बॉलीवुड स्टारची हजेरी असंते. नवनीत कौर यांचे पती आमदार रवि राणा गेल्या दहा वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत कौर राणा यांनी निवडणूक लढविली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट