नवीन लेखन...

नवरत्नमालिका – ३

स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां
हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् ।
वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां
मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥

आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य.
अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे.
अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्‍या, विमलगण्डलम्बिमणिमण्डलां – विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, स्वच्छ, पवित्र. गंड म्हणजे गालाच्या वर आणि डोळ्यांच्या खाली असणारे, डोळे आणि कान यांच्यामधील उंचवटे.
आई जगदंबेच्या या कपोल प्रदेशावर तिच्या मणी अर्थात विविध रत्न लटकवलेल्या बटा रुळत आहेत. अशा बटांनी अधिकच आकर्षक दिसणाऱ्या,

हारदामपरिशोभमान- मोत्यांच्या असंख्य माळांनी अत्यंत शोभायमान असणाऱ्या,
कुचभार- समस्त विश्वाच्या भरणपोषणासाठी पर्याप्त स्वरूपात विश्व तृप्तीकारक अमृताने भरलेल्या स्तन मंडलाने,
भीरुतनुमध्यमाम् – मध्यभाग अर्थात नाजुक कंबर भंग पावेल की काय? अशी भीती असणाऱ्या, अर्थात आई जगदंबेची कंबर इतकी नाजूक आहे की हार आणि स्तनभाराने ती लचकेल की काय? अशी शंका निर्माण होते, इतकी नाजूक.
वीरगर्वहरनूपुरां- विश्वातील समस्त वीरांचा गर्व ज्या नुपुरांच्या अर्थात त्या पैंजणांनी युक्त असणारी चरणकमले नष्ट करतात अशा,

अर्थात जगातील सर्व वीर जिच्या चरणी शरण येतात अशा, विविधकारणेश्वरपीठिकां- अनेक शंकरांना आपले चरणपीठ म्हणजे पाय ठेवण्याचे साधन समजणाऱ्या,

मारवैरिसहचारिणीं- मार अर्थात कामदेव. त्याचे वैरी म्हणजे भगवान शंकर. त्यांची सहधर्मचारिणी असणाऱ्या,

मनसि भावयामि परदेवताम् – परमदेवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 414 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..