नवीन लेखन...

नवरत्नमालिका – ४

भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां
वारिराशिमणिमेखलावलयवह्निमण्डलशरीरिणीम् ।
वारिसारवहकुण्डलां गगनशेखरीं च परमात्मिकां
चारुचन्द्ररविलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ४॥

आई जगदंबेच्या अतीविराट विश्वरूपाचे इथे वर्णन साकारण्यात आले आहे. विश्वातील अतीव वैभवशाली पंचमहाभूते ही जणूकाही आई जगदंबेची अवयव वा आभूषणे आहेत असे अतिभव्यतम वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात,

भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां- भूरी म्हणजे प्रचंड. भार अर्थात वजन. सगळ्यात जास्त वजन कशाचे? तर या पृथ्वीचे. त्याला जो धारण करतो तो भूरीभारधर. कोण? तर कुंडलीद्र. कुंडली म्हणजे वेटोळा. वेटोळा घालून बसणारा प्राणी म्हणजे साप. त्या सर्व सापांचा इंद्र अर्थात राजा म्हणजे भगवान श्री शेषनाग.

त्याच्या मस्तकावर असणाऱ्या मण्याप्रमाणे असणारी पृथ्वी. भूवलय. ती पृथ्वी ही जिचे पदपीठ अर्थात पाय ठेवण्याचे आसन आहे अशी.
वारिराशिमणिमेखलावलय- वारी म्हणजे पाणी. ज्याची राशी म्हणजे साठा.सगळ्यात मोठी जलराशी समुद्र. तो समुद्र हीच जणू आई जगदंबेची मेखला, कंबरपट्टा आहे. कंबर पट्टा सतत हलत राहतो. तसा समुद्रही लाटांच्या स्वरूपात हलत राहतो. पण कंबर पट्टा कधी जागा सोडत नाही. तसा समुद्र आपल्या जागी स्थिर असतो. त्यामुळे त्याला कंबरपट्टा म्हटले आहे.
वह्निमण्डलशरीरिणीम् – या विश्वातील सकल वह्निमंडळ अर्थात तेजस्वी गोष्टी या आईच्या शरीर दृश्य स्वरूप आहेत. जेथे जेथे तेज आहे तेथे आईचे प्रगटीकरण आहे असा अर्थ.
वारिसारवहकुण्डलां- वारी म्हणजे पाणी. त्याचे सार म्हणजे भरलेला साठा. असा पाण्याचा साठा म्हणजे ढग वाहून नेतो तो वारा आईची कुंडले आहेत.
त्याची हालचाल तेथे गृहीत आहे.
गगनशेखरीं- गगन म्हणजे आकाश हेच जिचे शिखर म्हणजे मस्तक आहे अशी.
परमात्मिकां- परब्रह्मस्वरूपिणी.
चारुचन्द्ररविलोचनां- चंद्र आणि रवी म्हणजे सूर्य हेच जी चारू म्हणजे अत्यंत सुंदर नेत्र आहेत अशा,

मनसि भावयामि परदेवताम् – परम देवता आदिशक्तीचे मी मनाने ध्यान करतो.

— प्रा. स्वानंद गजानन पुंड

प्रा. स्वानंद गजानन पुंड
About प्रा. स्वानंद गजानन पुंड 414 Articles
लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी म्हणजे येथे संस्कृत विभाग प्रमुख रूपात कार्यरत. २१ ग्रंथात्मक श्रीगणेशोपासना ग्रंथमालेची लिम्का बुक ऑफ रिकार्ड मध्ये विक्रम रूपात नोंद. श्रीमुद्गलपुराण कथारूप आणि विश्लेषण ही ९ खंड १७०० वर पृष्ठांची ग्रंथमालिका. विविध धार्मिक ,शैक्षणिक, सामाजिक संस्थांमधून २१०० वर प्रवचन, व्याख्याने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..