नवीन लेखन...

नवरात्री विशेष

आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण, उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत.अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. काली, दुर्गा, अम्बा, लक्ष्मी….. ह्या देवींचे गायन-पूजन केले जाते. ह्या सर्व देवी ज्यांना शक्तीस्वरुपा ही म्हटले जाते. अष्ट भूजाधारी अस्त्र-शस्त्रानी सुशोभित असे रूप दाखवले जाते. देवी आणि हिंसा ह्या दोन विरोधाभासी गोष्टी त्यांच्यामध्ये दाखवल्या जातात. एकीकडे वात्सल्य रूप आई (माता ) म्हटले जाते. तर दुसरीकडे असुर सहारिणी ही दाखवली जाते. अर्थातच ह्या सर्व देवी पवित्रता, स्नेह, शक्तीचे प्रतिक आहेत. पण त्याच बरोबर दुर्गुणाचा नाश करणारी शक्ती ही आहे. पौराणीक कथांमध्ये चंड, मुण्ड, निकुंभ,…. अश्या अनेक असुरांचा नाश करणारी शक्तिरूपा देवींचे गायन केले आहे. व्यावहारिक जीवनामध्ये जर आपण बघितले तर हि आपलीच प्रतीके आहेत. आज आपले युद्ध कोणा व्याक्तीबरोबर नसून स्वतः च बरोबर आहे. म्हणून ह्या दुर्गुणांना समाप्त करण्यासाठी अष्ट शक्तीना धारण करण्याची गरज आहे.त्यासाठी आपण नऊ दिवस जागरण, व्रत, उपवास करतो. ह्या सर्वाचे आध्यात्मिक अर्थ आपण जाणून घेऊ या.
नवरात्री ज्यामध्ये प्रथम दिवशी घटस्थापना केली जाते. मातीच्या सजवलेल्या घटामध्ये दिवा लावला जातो व त्याची घरामध्ये, मंदिरामध्ये स्थापना केली जाते. मातीचा घट हे ह्या नश्वर शरीराचे प्रतिक आहे व त्यात लावलेला दिवा हा चैतन्य शक्ती आत्म्याचे प्रतिक आहे. शरीर साधन आहे परंतु आत्मा चैतन्य आहे म्हणून अष्ठ भूजाधारी असे रूप देवींचे दाखवले जाते. ज्या मनुष्याने ही आत्मज्योत प्रज्वलित केली तोच दुर्गुणाचा नाश करण्यासाठी ह्या अष्ट शक्तींचा वापर करू शकतो. स्नेह आणि शक्ती चे संतुलन ठेवून आपली सर्व कर्तव्ये पार पडू शकतो. आत्मज्योती ला जागवणे म्हणजेच खरे जागरण.व्रत अर्थात दृढ संकल्प करणे. आपल्या सर्वांमध्ये काही चुकीच्या सवयी आहेत जसे रागावणे, खोटे बोलणे, दुखी होणे…. ह्याना समूळ नष्ट करायचे असेल तर शक्तिशाली संकल्प करणे आवश्यक आहे. पण आपण काही पदार्थ न खाण्याचे व्रत घेतो, आज कोणत्याही परिवर्तनासाठी दृढता हवी. तसेच उपवास म्हणजे ईश्वरीय स्मृती मध्ये राहणे.तेव्हाच आपल्यामध्ये ह्या शक्तीचा संचार होईल.प्रभू स्मृती मध्ये राहण्याचा अभ्यास फक्त काही दिवसांसाठी नाही पण त्याला आपल्या जीवनाची धारणा बनवावी.अशी ज्ञानयुक्त प्रेरणा देणारा हा नवरात्री उत्सव.

अष्टभुजा हे आत्म्याच्या आठ शक्तीचे सूचक आहे. प्रत्येक शक्तीचे महत्व आपल्या जीवनात आहे. त्यातील एक ही शक्तीची कमी असेल तर जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. म्हणून ह्या शक्तींचे महत्व व त्याचे रूप ह्यांना जाणून घेऊया.

पार्वती देवी ( विस्ताराला संकीर्ण करणे ):-

आज मनुष्यासमोर समस्यांची मालिका चालू आहे, रोज तिचे नवे रूप. अश्या वेळी त्या परिस्थिती वर जास्त विचार करण्याची सवय ह्या मनाला लागते. पण विस्तार केल्याने वेळ, शक्ती, संकल्प… ह्यांचा फक्त खर्चच होतो. जितक्या कमी वेळात त्याला साररुपात समजू तितके आपण समाधानावर विचार करू शकू. एखादा रुग्ण डॉक्टर कडे जातो तेव्हा डॉक्टर कधी हे विचारात नाही कि हा आजार का झाला पण तो लगेच त्याचा इलाज सुरु करतो.तसेच आपण हि प्रश्नार्थक न बनता शोर्ट मध्ये परिस्थिती चे गांभीर्य समजून पुढे जावे. अशी सवय लावल्याने मनाची शक्ती टिकवून ठेऊ शकतो.ह्या शक्तीचे प्रतिक पार्वती देवी दाखवली जाते. शंकर तपस्येमध्ये मग्न असले तरी पार्वती देवी आपल्या जवाबदाऱ्या पार पाडते अर्थात आपण गृहस्थ जीवना मध्ये राहूनच हि practice करावी. तसेच पार्वती देवी बरोबर गाय दाखवली जाते. गायी ला शुभ मानले जाते. तसेच तिचे प्रत्येक अवयव उपयोगी पडतात जसे दुध, तूप, शेण…. ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. अर्थात नवजीवन देण्याची क्षमता गायी मध्ये आहे. जेव्हा आपल्यामध्ये साररुपात बाबींना समजण्याची कला येते तेव्हा शक्तिशाली बनून आपण दुसऱ्यांना बळ देऊ लागतो.

रोज सकाळी थोडासा वेळ स्वतःला बाहेरच्या वातावरण पासून detach करण्यासाठी काढावा. एका तासामधला एक मिनिट जर स्वतः ला detach करण्यासठी दिला तर परिस्थितींच्या प्रभावापासून मुक्त राहू शकू. पार्वती अर्थात परिवर्तनासाठी तयार. काही मनुष्य व्यक्ती, परिस्थिती च्या परिवर्तनाची वाट बघतात. किवा आपल्या दुःखाचा दोष दुसऱ्याला देतात. पण ज्याच्या कडे detach, साक्षी होईल समस्यांना बघण्याची कला आली ते सहज परिवर्तनासाठी तयार होतात.

दुर्गा देवी (समेटण्याची शक्ती ):-

आजची वर्तमान परिस्थिती आपल्याला अचानक येणाऱ्या सर्व घटनांसाठी तयार राहण्याचा मौन संदेश देत आहे. ‘श्वास का क्या विश्वास’ म्हणजेच आपला अन्त कधी आहे ते आपल्यालाच माहित नाही. एक दिवस सर्वांनाच जायचे आहे म्हणून कोणतीही गोष्ट पकडून ठेऊ नका. आज मनामध्ये जुन्या गोष्टी, कोणी केलेले नुकसान, अपमान… खूप काही जमा केलेले आहे. जर ह्या गोष्टीना आपण सोडले नाही तर आत्मा दुसऱ्या जन्मामध्ये त्या सर्व गोष्टीना घेऊन जाईल. ते दुःख एका सावली प्रमाणे बरोबर राहील. म्हणून झालेल्या सर्व बाबींना लगेच विसरण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये गाठ बांधून ठेऊ नये. तसेच आपल्या हातून काही अनिष्ट घडले असेल तर त्याचाही पश्चाताप होतो. त्याना विसरणे ही मुश्किल. अश्या अनेक भावनांनी भरलेले आपले मन शक्तिशाली कसे असू शकेल? तसेच काहीना दुसऱ्या कडून खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण नाही झाल्या तर त्यांचा पण मनात गोंधळ चालत राहतो. त्या इच्छा मनात घर करून जातात. पण आपण सर्व जाणतो की आपण काहीच बरोबर घेऊन जाणार नाहीत. जाणार ते आपलेच स्वतः चे कर्म, त्यावर आपले लक्ष असावे.तेव्हाच आपण सर्वाना स्वीकार करू शकतो म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक दुर्गा देवी दाखवली जाते. जिला आई म्हटले जाते. प्रेम आणि शक्तीचे प्रतिक आहे. जो व्यक्ती जुन्या गोष्टीना लवकर सोडत जाईल तोच दुसऱ्यांशी प्रेमाने व्यवहार करू शकतो व शक्तिशाली स्थिती बनवू शकतो.दुर्गादेवीच्या हातामध्ये शस्त्र असली तरी नयन स्नेहमयी दाखवले जातात. आणि शेरावली ही म्हटले जाते अर्थात विकारांच्या मोठ्या रूपावर विजय मिळवणे. माफ करण्याची शक्ती असेल तर मनाने हलके राहू शकतो.आत्म्याची ही दुसरी शक्ती आहे जिला दुर्गारुपाने दाखवले आहे.

जगदम्बा देवी ( सहन करण्याची शक्ती ):-

आज प्रत्येकाच्या मुखाद्वारे हे शब्द ऐकायला मिळतात कि ‘मी खूप सहन केलं, माझ्या जागी कोणी दुसरे असते तर माहित नाही त्याचे काय झाले असते…..’ पण खरंतर असे बोलून आपण आपली शक्ती कमी करतो, त्याला बांध घालतो. मी किती सहन करू, कोणा कोणाचे सहन करू. कुठपर्यंत करू… असे अनेक प्रश्न सहन करण्याला घेऊन आपल्याकडे आहेत. पण आपण तेव्हा सहन करतो जेव्हा आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग नसतो. ज्या लोकांबरोबर आपण राहतो त्यांना सोडू शकत नाही, job दुसरा मिळू शकत नाही…. अश्या जेव्हा समस्या आपल्या समोर असतात तेव्हा आपण सहन करतो. पण सहन करणे म्हणजे झालेल्या गोष्टीना मनापासून विसरणे. आपण तर सर्व गोष्टीना पकडून ठेवतो आणि म्हणतो की खूप सहन केलं. मनात पकडून ठेवलेल्या गोष्टी आपल्या शक्तींचा ऱ्हास करतात. सहनशक्तीचे प्रतिक जगदम्बा देवीला दाखवले जाते. सहन करण्यासाठी आपली स्थिती आई समान बनवण्याची आवश्यकता आहे. आई जसे मुलाच्या सर्व गोष्टीना स्वीकार करते पण त्याच बरोबर परिवर्तन करण्याची शक्ती सुद्धा असते तसेच आपण पहिले आपल्या मनाच्या सर्व गोष्टीना समजण्यासाठी वेळ द्यावा.जेव्हा असा वेळ देऊ तेव्हा सर्वाच्या संस्कारांना समजून घेऊ शकतो मग तुम्ही घरी, ऑफिस किवा एखाद्या संघटने मध्ये असतील तिथे तुम्ही शक्ती बनून कार्य करू शकता.

जेव्हा आपण प्रसंगांना let go करू तेव्हाच आपण सहन करून सर्वांचा स्वीकार करू शकतो. हे सर्व natural होईल.त्यासाठी मेहनत नाही लागणार.

संतोषी माता (सामावून घेण्याची शक्ती ):-

आपल्यामध्ये सर्व शक्ती आहेत पण आपण काहींचा उपयोग करतो, काहींचा नाही. पण ह्या सर्व आत्म्याच्या powers आहेत. सामावून घेणे म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेऊया.कधी कधी लोकांना असे वाटते कि जे जसे आहेत मग कोणी चुकीचे वागत असेल तरी त्याला सामावून घ्या, पण तसे नाही. आपल्याला माहित आहे कि सर्वांचे संस्कार वेगळे आहेत,ते भिन्न असले तरी त्याच्या गोष्टीना पकडून न ठेवणे.मनामध्ये हे असे का,कशाला, कुठे, केव्हा…. अश्या प्रश्नांची रांग लागते.पण प्रोब्लेम चे चिंतन करण्यापेक्षा जे जसे आहे त्याला स्वीकार करून पुढे समाधान शोधणे. ही शक्ती धारण करण्यासाठी संतुष्टते चा गुण आणावा. जितक आणि जस मिळाले त्यात समाधानी राहावे कारण खूप अपेक्षा असतील तर सामावून घेणे कठीन जाईल. म्हणून ह्या शक्तीला संतोषी मातेच्या रुपामध्ये दाखवले आहे. जिच्या हातामध्ये तांदूळ दाखवले जातात. जी व्यक्ती समाधानी तसेच सर्वांना सामावून घेते तीच आपल्या जीवना मध्ये संतुष्ट राहू शकते.

गायत्री देवी (पारखण्याची शक्ती ):-

आज आपल्या समोर एखादी समस्या आली तर आपण दहा लोकांना विचारतो कि काय करायला हवे. म्हणजेच पारखण्याची शक्ती नाही. जेव्हा व्यक्ती स्वतःला समजून घेतो, focus स्वतः वर ठेवतो तेव्हा त्याच्या मध्ये चांगले-वाईट ची समज वाढते. व्यक्ती, परिस्थिती चे फक्त बाह्य रूप न बघता त्याचा खोलवर विचार करतो. म्हणून गायत्री देवी दाखवली जाते.जिच्या हातामध्ये स्व दर्शन चक्र व शंख, हंस आसन दाखवले जातात.स्वदर्शन म्हणजे प्रत्येक घटनेमध्ये मला माझे विचार, बोल आणि कर्म कसे असावे ह्यावर लक्ष ठेवणे. ज्या आत्म्याने आपल्या व्यवहाराला नियंत्रित केले, ज्याच्या कर्मांमध्ये कोणत्याही प्रकारचे मिश्रण नाही असा व्यक्ती सर्वांचे भले करू शकतो. कारण त्याची बुद्धी शुद्ध पवित्र आहे. अश्या व्यक्तींचे जीवन सर्वाना प्रेरणा देणारे ठरते. गायत्री देवी चे वाहन हंस दाखवला जातो.हंस मोती चा स्वीकार करतो. अर्थात शुद्ध बुद्धी चांगले आत्मसात करून वाईटाचा त्याग करते.आज आपल्याला कोण चांगले कोण वाईट हे समजत नाही त्यामुळे नुकसान होते. म्हणून पारखणे आवश्यक आहे. रोज मनाला शांत करण्याची व ध्यान करण्याचा अभ्यास केला तर नक्कीच लोकांच्या वायब्रेशन्स ना catch करू शकतो.

सरस्वती देवी ( निर्णय करण्याची शक्ती ):-

अचूक पारखता आले तर निर्णय करणे सहज होते. कारण कोणताही निर्णय आपले व दुसऱ्याचे भाग्य बनवतो. प्रत्येक निर्णय आपल्या जीवनावर परिणाम करतो. म्हणून कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करावा.तसेच जो निर्णय घेतला आहे त्यावर तटस्थ राहावे.तेव्हा आत्म्याची शक्ती वाढते.त्याचबरोबर आपण दुसऱ्यांचा जीवनाचे निर्णय न घ्यावे कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. सल्ला अवश्य द्यावा पण तसेच करावे हा अट्टाहास नसावा. प्रत्येकाचे भाग्य वेगळे आहे, ह्या कर्म सिद्धांताला लक्षात ठेवावे. म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक सरस्वती देवी ला दाखवले आहे जिच्या हातामध्ये वीणा आहे. आपल्या जीवनाची script स्वतः लिहिणारे. स्वतः चे निर्णय, मते स्वतः ठरवणारे पण त्याचबरोबर सर्वांबरोबर राहणारे असे संतुलन ठेवणारे जीवन त्यांच्या मध्ये दिसून येते. म्हणून सरस्वती देवी च्या हातामध्ये माला दाखवली आहे.

काली देवी (सामना करण्याची शक्ती):-

ह्या शक्तीला थोडे समजून घेऊ या कारण जिथे सामना करायचा तिथे सहन करतो व जिथे सहन करायला हवे तिथे सामना करतो.त्यामुळे समस्या समाप्त होण्याएवजी वाढत जातात.म्हणून ह्या शक्तीला कालीदेवी च्या रुपामध्ये दाखवले जाते.बाकीच्या शक्ती सकारात्मक उर्जा निर्माण करतात. प्रेमाने, समजुतीने परिस्थितीला तोंड द्यायला शिकवतात पण ही शक्ती आपल्याला अन्याय, चुकीच्या गोष्टींचा सामना करायला शिकवते. जसे काळी देवीचे रूप भयंकर दाखवले जाते, बाकीच्या देविंसारखा शृंगार ही नाही कारण ही शक्ती सर्वप्रथम आपल्या कमीना समाप्त करण्याची प्रेरणा देते.जसे काही चुकीच्या सवयींना आपण चालवून घेतो मग त्या आपल्या असो किवा दुसऱ्यांच्या. ज्या व्यक्ती मध्ये काही कमी असतील तो दुसऱ्यांच्या कमीचा सामना करू शकत नाही. म्हणून काली देवीच्या गळ्यामध्ये असुरांची मुंड माला दाखवली आहे तसेच हातामध्ये असुराचे डोके. अर्थात सर्व कमीना समाप्त करण्यासाठी त्याचे मूळ समाप्त करणे आवश्यक आहे ते म्हणजे देह अभिमान ( body consciousness). हा विकार जर राहिला तर त्याच्या पाठी सर्व विकार पुन्हा जन्म घेऊ शकतात. जागृत राहून ह्या कमीना नष्ट करू या.

लक्ष्मी देवी (सहयोग शक्ती):-

जर ह्या सात शक्ती आपल्या मध्ये आल्या तर आपण let go करणे, बाबींना विसरणे, कठीण परिस्थिती मध्ये अचूक निर्णय करणे, सहन करणे…. ह्या सर्व गोष्टी सहज करू लागतो. समस्येमध्ये स्वतः ला शांत ठेवून ही आपण सहयोग देतो.म्हणून ह्या शक्तीचे प्रतिक लक्ष्मी देवी दाखवली आहे. कमलासिनी अर्थात ह्या कलियुगामध्ये राहून स्वतःला अलिप्त ठेवणे. प्रत्येक संकल्प, बोल, कर्म पवित्र आणि सुखदायी बनवणे.

वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते.

अश्याप्रकारे ह्या सर्व शक्तींचे आपापसात सूक्ष्म संबंध आहेत. एका शक्तीची कमी असेल तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम होतो, म्हणून meditation च्या अभ्यासाने ह्या शक्तींना आत्मसात करू या.वेळोवेळी ह्यां शक्तींचा वापर करून त्यांचा अनुभव करू या. ह्या सर्व शक्तींना शिवशक्ती म्हटले जाते. ईश्वराकडून शक्ती घेऊन आपण स्वतः ला शक्तिशाली बनवू या.

— ब्रम्हकुमारी नीता.

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..