नवीन लेखन...

नवरात्रोत्सवाचे महान पर्व व ५१ शक्तीपीठ !

आदिशक्ती माता दुर्गेच्या उपासनेचे पर्व म्हणुन, नवरात्रोत्सव समस्त भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी व सिद्दीदात्री अशा देवीच्या नऊ स्वरुपांची आराधना नऊ दिवस केली जाते. दुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. देवीच्या शक्तीपीठांपैकी महाराष्ट्रात साडेतीन शक्तीपीठ आहेत. कोल्हापुरची महालक्ष्मी, शिवछत्रपतींची कुलस्वामीनी तुळजापुरची भवानी(तुकाई). २१ वेळा पृथ्वीला निःक्षत्रीय करणर्‍या परशूरामांची जननी, माहुरगडची(मराठवाडा) रेणूकामाता तसेच सप्तशृंग गडावरची सप्तशृंगीमाता(अर्धेपीठ) अशी साडेतीन शक्तीपीठे आहेत.

कोल्हापुरची महालक्ष्मी हे एक जगदंबेचे रुप असुन, हिलाच महिषासुरमर्दिनी असे संबोधले जाते. साडेतीन पिठांपैकी हे एक स्थान आहे. आदिमहाशक्तीच्या त्रिगुण प्रकृतियुक्त तीन मुर्ती आहेत, त्यापैकी सत्वगुणविशिष्ट महालक्ष्मी कोल्हापुरला आहे, तर रजोगुण महासरस्वती तुळजापुरला असुन, तमोगुणवती महाकाली माहुरगडला आहे. तसेच सुदर्शनचक्र धारण करणारी, प्रसन्नवदना कमलासना माहिषासुरमर्दिनी सप्तशृंगी हे अर्धे पीठ होय. महालक्ष्मीच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये कोल्हापुर, बिलववेढ(डहाणू), केळशी, आडिवरे(जि.रत्नागीरी), कुडाळ,वाई, बांदिवाडे, मांदे(गोवा) यांचा समावेश आहे.

माहुरगड म्हणजे प्राचीन काळातील मातापुर होय, भगवान परशुरामांची माता तसेच शिघ्रकोपी जमदग्नी ऋषींची पत्नी रणुकेचे स्थान माहुरगडावर आहे. त्रिदेवांचे स्वरुप दत्तात्रयांची माता म्हणुनही संबोधले जाते. जवळच गडावर दत्तात्रयांचे जागृत स्थानही आहे. गडावर मुर्ती नसुन मुखवटा आहे, यालाच शिरोभागाचा आकार दिला असुन देवीचे रुप व मुद्रा उग्र आहे.

तुळजापुरची भवानी(तुकाई), हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची कुलस्वामीनी म्हणुन, तसेच समर्थ रामदासांची आराध्य देवता म्हुणन ओळखली जाते. सिंहावर स्वार अष्टभुजा तुळजाभवानी दृष्टांचा निर्दालन कारणारी आहे. तुळजापुरला नवरात्रात मोठी यात्रा भरते, शिवरायांनी प्रतापगडावार बांधलेले तुळजाभवानीचे मंदिर असुन सिंहगडाजवळ कोंढणपुरला त्यांनीच बांधलेले तुकाईचे मंदिर आजही दर्शनासाठी खुले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत सप्तशृंग गडावर माता सप्तशृंगीचे स्थान आहे, याच गडावर इंद्राणी, कार्तिकेयी, वारधि, शिवा, चामुंडा, वैष्णवी, नारसिंही अशा सप्तदेवतांचेही स्थान आहे. असुरांचा संहार करुन त्रिगुणात्मक ॐकार स्वरुप धारण केलेली सिंदुररचित सप्तशृंगवासिनी अठरा हातांची देवीची मुर्ती आहे. मच्छिंद्रनाथ, संत ज्ञानेश्वर व समर्थ रामदास हे उपासना सुरु करण्यापुर्वी इथे आल्याचे उल्लेख आढळतात.

महाकाली आदीशक्तीचे एक रुप असुन, आसुरीशक्तींना संपवणारी संहारक समजली जाते. देवीच्या रौद्रभिषण रुपालाच महाकाली म्हटले जाते. मधु-कैटभ नावाच्या दैत्याच्या संहारासाठी देवीने हा अवतार घेतला. हातात विविध आयुधे, गळ्यात नररुंडमाला, हातात दैत्यांचे कापलेले शिर, रक्ताने माखलेले मुख असे रौद्र रुप असले तरी देवी वरदायिनी आहे. संकटकाळी भक्तांचे रक्षण करणारी आहे. महाकाली ही, तरुणांचे ह्रदयस्थान, स्वामी विवेकानंदांचे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांची आराध्य देवता होती. महाकालीच्या स्थानांमध्ये विदर्भातील ‘चंद्रपुरची महाकाली’ या स्थानाचाही समावेश आहे.

विदर्भातील केळापुरचे(यवतमाळ) खुनी नदीच्या तीरावरील जगदंबेचे स्थान अती प्राचीन काळापासुन प्रसिद्ध आहे. देवगीरीच्या राजा रामदेवरायाच्या शासनकाळापासुन केळापुरची जगदंबा, कुंथलपुरची भवानी म्हणुन प्रसिद्ध आहे. ‘जैमिनी अश्वमेघ’ या प्राचीन ग्रंथातील उल्लेखानुसार, राजा चंद्रहास याची कुंथलपुर(केळापुर) ही राजधानी होती. त्यानेच हे मॉ जगदंबेचे मंदिेर बांधले. याबाबत डॉ.वाय.एम.काळे यांच्या ‘विदर्भाचा इतिहास’ व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्राचा इतिहास’ या पुस्तकांमध्ये उल्लेख आहे.

मुंबई-पुणे मार्गावर लोणावळया जवळील कार्ला डोंगरावर गुफेत एकवीरा देवीचे मंदिर आहे, समुद्रावार काम करणार्‍या कोळी समाजाच्या बांधवांची, या देवीवर अगाध श्रद्धा आहे. एकवीरा देवीची आख्यायिका महाभारतातील पांडवांशी संबंधीत आहे.

आद्दशंकराचार्यांची आराध्य देवता त्रिपुरासुंदरी हे सुद्धा देवीचेच एक रुप आहे. त्रिपुरासुंदरीला कदंबपुष्प अतिशय प्रिय आहे. अल्मोडा येथे देवीचे भव्य मंदिर आहे.

सातारा जिल्हयातिल औंध येथील उंच डोंगरावरील यमाईदेवीचे स्थान, अहमदनगर जिल्हयातील राशीन येथील यमादेवी, बेळगावजवळील सौंदत्ती येथील यल्लमादेवीचे स्थान, मराठवाड्यातील बीड जिल्हयातील अंबेजोगाई येथील स्वयंभू योगेश्वरी, म्हाळसादेवी, माहेश्वरी, ललितादेवी, माटलादेवी, अपर्णादेवी, महामाया, शांकभरीदेवी, वैष्णोदेवी, चामुंडा आदी रुपे दुर्गेचीच आहेत. सर्व स्थानांवर नवरात्रात मोठा उत्सव असतो.

शक्तीपिठांच्या संदर्भात अशी आख्यायिका सांगीतली जाते कि, दक्षाच्या घरील यज्ञकार्यातील अपमानाच्या ग्लानिने दग्ध झालेल्या आदिमायेने, योगमायेने स्वतःचा प्राणत्याग केला. शिवशंभुला हे कळल्यावार कालभैरवाच्या माध्यामातुन शंकराने दक्षाचा वध केला. भोलेनाथाच्या क्रोधाने प्रलय यावा तसे ब्रम्हांडात अघटीत घडायला लागले. स्वतः यज्ञमंडपात येऊन सतीचे कलेवर खांधावर घेऊन निघुन गेले, सतीचे अचेत कलेवर खांधावर घेऊन शिवशंभू सैरभैर फिरु लागले. संभवित अघटिताची कल्पना सर्व देवांना आली, सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली.

५१ शक्तीपीठांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील, फक्त नाशिक जिल्हयातील गोदावरी नदीच्या जवळील ‘भ्रामरीदेवी’ या शक्तीपिठाचा समावेश आहे.

माता दुर्गेची ५१ शक्तीपीठः-

१)भ्रामरीदेवी, गोदावरी नदी,नाशिक (महाराष्ट्र) भारत

२)महामाया, अमरनाथ पहलगाव(काश्मिर) भारत

३)सिधिदा (अंबिका) / ज्वालाजी, कांगड़ा(हिमाचल प्रदेश) भारत

४)त्रिपुरमालिनी, छावनी स्टेशन जवळ जालंधर(पंजाब) भारत

५)जयदुर्गा, बैधनाथधाम देवघर(झारखंड) भारत

६)विमला, बिराज उत्कल (ओरीसा)

७)देवी बाहुला, अजेय नदिच्या तीरावर, केतुग्राम कटुऑ, जि.वर्धमान(पश्चिमबंगाल) भारत

८)मंगलचंद्रिका, उजैन, जि.वर्धमान,पश्चिमबंगाल)भारत

९)त्रिपुरसुंदरी, माताबढी पर्वतशिखर, राधाकिशोरपुर गावाजवळ, उदरपुर(त्रिपुरा) भारत

१०)भ्रामरी, सालबाढ़ी, ता.बोडा, जि.जलपाइगुड़ी(पश्चिम बंगाल)

११)कामाख्या, नीलांचल पर्वत, गुवाहाटी(असाम)भारत

१२)जुगाड्या, जुगाड़्या,खीरग्राम, जि.वर्धमान(पश्चिम बंगाल) भारत

१३)कालिका, हुगळी नदीच्या तीरावर कालिघाट, कलकत्ता(पश्चिम बंगाल) भारत

१४)ललितादेवी, प्रयाग संगम, इलाहाबाद(उत्तर प्रदेश) भारत

१५)विमला, किरीटकोण, लालबाग कोर्ट रोड स्टेशन, जि.मुर्शीदाबाद(पश्चिम बंगाल)भारत

१६)विशालाक्षी तथा मणिकर्णी, मणिकर्णिका घाट,काशी, वाराणसी(उत्तर प्रदेश) भारत

१७)श्रवणी/कन्याकुमारी कन्याश्रम,भद्रकाली मंदिर, कुमारी मंदिर(तामिळनाडु) भारत

१८)सावित्री, कुरुक्षेत्र(हरियाणा) भारत

१९)गायत्री, मणिबंध,गायत्री पर्वत, पुष्करजवळ, अजमेर(राजस्थान) भारत

२०)देवगर्भ, कांची,कोपई नदीतीरावर, उत्तर-पूर्व बोलापुर स्टेशन, जि.वीरभुम(पश्चिम बंगाल) भारत

२१)कालीदेवी, कमलाधव, शोणनदी च्या तीरावर गृहेत, एका गृहेत, अमरकंटक(मध्य प्रदेश) भारत

२२)नर्मदा, नर्मदा नदीच्या उगमावर अमरकंटक(मध्य प्रदेश) भारत

२३)शिवानी, रामगिरी, झांसी-माणिकपुर रेल्वे मार्गावर, चित्रकूट(उत्तर प्रदेश) भारत

२४)उमा, भूतेश्वर महादेव मंदिराजवळ वृंदावन मथुरा(उत्तर प्रदेश) भारत

२५)नारायणी, शुचितीर्थम शिवमंदिर, कन्याकुमारी-तिरुवनंतपुरम मार्गावर, शुची(तमिळनाडु) भारत

२६)वाराही, पंचसागर (उत्तरांचल) भारत

२७)श्री सुंदरी, श्रीपर्वत, लद्दाख(कश्मीर) याशिवाय श्रीशैलम, जि.कुर्नूल(आंध्रप्रदेश) ह्यालाही मान्याता आहे.

२८)कपालिनी (भीमरूप), विभाष,तामलुक, जि.पूर्व मेदिनीपुर(पश्चिम बंगाल) भारत

२९)चंद्रभागा, प्रभास,वेरावल स्टेशन,सोमनाथ मंदिराजवळ, जि.जूनागढ़(गुजरात) भारत

३०)अवंती, भैरवपर्वत,क्षिप्रा नदीच्या तीरावर, उज्जयिनी(मध्यप्रदेश) भारत

३१)राकिनी/विश्वेश्वरी, सर्वशैल/गोदावरीतीर, कोटिलिंगेश्वर मंदिर, राजमहेंद्री(आंध्रप्रदेश) भारत

३२)कुमारी, रत्नावली,रत्नाकर नदीतीरावर, खानाकुल-कृष्णानगर, जि.हुगली(पश्चिम बंगाल) भारत

३३)अंबिका, बिरात,भरतपुरजवळ (राजस्थान) भारत

३४)कलिका देवी, नलहाटी, नलहाटी स्टेशनजवळ, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत

३५)जयदुर्गा, कर्णाट(कांगडा) (हिमांचल प्रदेश) भारत

३६)महिषासुरमर्दिनी, वक्रेश्वर, पापहर नदीतीरावर, दुबराजपुर स्टेशन, बीरभूम(पश्चिम बंगाल) भारत

३७)फुल्लरा, अट्टहास,लाभपुर स्टेशन जवळ, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत

३८)नंदिनी, नंदीपुर,चारदीवारी मध्ये वटवृक्ष,सैंथिया रेलवे स्टेशन, जि.वीरभूम(पश्चिम बंगाल) भारत

३९)महाशिरा, गुजयेश्वरी मंदिर, पशुपतीनाथ मंदिराजवळ (नेपाळ)

४०)गंडकी चंडी, मुक्तीनाथमंदिर गंडकी नदीच्या तीरावर पोखरा (नेपाळ)

४१)उमा, मिथिला,जनकपुर रेलवे स्टेशनजवळ, भारत-नेपाल सिमेवर (नेपाळ)

४२)दाक्षायनी, कैलाशपर्वत मानसरोवर (तिबेट)

४३)यशोरेश्वरी, यशोर, ईश्वरीपुर, जि.खुलना(बांग्लादेश)

४४)अर्पण, करतोयतत,भवानीपुर, शेरपुर पासुन २८ कि.मी दुर, बागुरा स्टेशन,(बांग्लादेश)

४५)महालक्ष्मी, श्रीशैल,जैनपुर, उत्तर-पूर्व सिल्हैट टाउन,(बांग्लादेश)

४६)जयंती, कालाजोर भोरभोग, खासी पर्वत, जयंतिया परगना, जि.सिल्हैट,(बांग्लादेश)

४७)भवानी, चंद्रनाथ पर्वत शिखर, सीताकुण्ड स्टेशनजवळ, जि.चिट्टागौंग (बांग्लादेश)

४८)सुनंदादेवी, बरिसल पासुन २० कि.मी दुर शिकारपुर(बांग्लादेश)

४९)हिंङगोलादेवी/कोट्टरी हिंङगलज,कराचीपासुन १२५ कि.मी दुर (पाकिस्तान)

५०)नैनादेवी/महिषासुरमर्दिनी, सुक्कर स्टेशन जवळ (पाकिस्तान), याशिवाय नैनादेवी मंदिर बिलासपुर(हिमांचलप्रदेश) हे सुद्धा मानले जाते.

५१)इंद्रक्षी / नागपुषणीदेवी, जाफना (श्रीलंका) एका मतानुसार ट्रिंकोमाली मध्ये मंदिर असुन पोर्तुगाली बाम्बवर्षावात ते ध्वस्त झाले पण एक स्तंभ शिल्लक असुन, प्रसिद्ध त्रिकोणेश्वर मंदिराजवळ आहे.

याशिवाय काही ठिकाणी खालील शक्तीपीठांचाही ५१ मध्ये समावेश आहे-

१)कामाक्षीदेवी, कांचीपुरम् मेखला, कांची(तामिळनाडु) भारत

२)अम्बाजी, अरसुरी(गुजरात) भारत

३)ज्वालामुखी/ज्वाला, पठाणकोट(गुजरात)भारत

४)दन्तेश्वरी, दन्तेवाडा(छत्तीसगड) भारत

५)विंध्यवासिनी मंदिर, मिर्ज़ापुर, (उत्तरप्रदेश)भारत

६)महामाया मंदिर, अंबिकापुर, अंबिकापुर, (छत्तीसगढ़)भारत

७)योगमाया मंदिर, दिल्ली, महरौली, (दिल्ली)भारत

८)वैष्णोदेवी, (जम्मु-काश्मिर)भारत

— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..