नवीन लेखन...

नयनतारा सहगल

बंडखोर लेखिका, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खंदी पुरस्कर्ती अशी ओळख असलेल्या नयनतारा सहगल यांचा जन्म १० मे १९२७ रोजी झाला.

त्यांचे वडील बॅरिस्टर रणजित सीताराम पंडित. ते कोकणातल्या सावंतवाडी संस्थानातील कुडाळजवळील बांबोलीचे. रणजित हे १९ व्या शतकातील संस्कृती आणि प्राचीन भारतीय साहित्याचे गाढे विद्वान होते. पुण्यातील हुजूरपागा शाळा स्थापनेत सहभाग असलेले शंकर पंडित हे सहगल यांचे काका होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांची कन्या म्हणजे नयनतारा सहगल. ही त्यांची ओळख मानली जाते. त्यांना काश्मिरी आहे, असेही मानले गेले. नयनतारा सहगल यांचे वडील रणजीत पंडित यांनी “मुद्राराक्षस’, कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ आणि “राजतरंगिणी’ या तीन अभिजात संस्कृत ग्रंथांचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले होते.

ब्रिटिश अंमल असताना त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले होते. ते थोर स्वातंत्र्य सेनानी देखील होते. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतल्यामुळे कारावास भोगत असताना १९४४ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांची आई विजय लक्ष्मी पंडित यांनी देखील २ वर्ष कारावास भोगला, त्या १९५३ साली युनोच्या आमसभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या पहिल्या महिला होत्या. नयनतारा सहगल यांचे आजोळ नेहरू परिवारातील असूनही त्या राजकारणापासून नेहमी अलिप्त राहिल्या आहेत. सहगल यांनी स्वतःची ओळख मी नेहरू कुटुंबाची सदस्य म्हणून नव्हेतर स्वत: स्वतंत्रपणे निर्माण केलेली आहे. त्यांनी १९७० च्या इंदिरा गांधीच्या कालखंडात त्यांच्या विरुद्ध आणि जयप्रकाश आंदोलनाचे समर्थन करणारे अनेक लेख लिहिले होते. मामेबहीण असलेल्या इंदिरा गांधी यांच्या सोबतच्या मतभेदामुळे त्यांची इटली येथे राजदूत म्हणून झालेली नेमणूक रद्द करण्यात आली होती. मानवतावादी आणि स्त्रीवादी लेखिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी एकूण १८ पुस्तके लिहिली, त्यात ११ कादंबऱ्या, 2 गत अनुभव पर आत्मकथने आणि ५ संपादने आहेत. त्यांना मिळालेला साहित्य अकादमीचा पुरस्कार या साहित्य सेवेमुळे १९८६ साली मिळालेला होता.

आणीबाणीचा कडाडून विरोध करणा-या नयनतारा सहगल यांनी भारतात वाढलेल्या असहिष्णुतेबद्दल भारत सरकारचा साहित्य अकादमीचा पुरस्कार वापस केला होता. नयनतारा यांनी सर्व लिखाण हे इंग्रजीतून केले आहे. नियतकालिके, वृत्तपत्रांसाठी देखील त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांच्या लिखाणाची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

नयनतारा सहगल यांचे लेखन.
1) Prison and Chocolate Cake (memoir; 1954)
2) From Fear Set Free (memoir; 1963)
3) A Time to Be Happy (novel; 1963)
4) This Time of Morning (novel; 1965)
5) Storm in Chandigarh (novel; 1969)
6) The Freedom Movement in India (1970)
7) Sunlight Surrounds You (novel; 1970) (with Chandralekha Mehta and Rita Dar.
8.) The Day in Shadow (novel; 1971)
9) A Voice for Freedom (1977)
10)Indira Gandhi’s Emergence and Style (1978)
11) Indira Gandhi: Her Road to Power (novel; 1982)
12) Plans for Departure (novel; 1985)
13) Rich Like Us (novel; 1985)
14) Mistaken Identity (novel; 1988)
15) A Situation in New Delhi (novel; 1989)
16) Lesser Breeds (novel; 2003)
17)Relationship (collection of letters exchanged between Nayantara Sahagal and E.N.Mangat Rai;(1994)
18) Before Freedom: Nehru’s Letters to His Sister1909-1947 (edited by Nayantara Sahgal)

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ राज कुलकर्णी

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..