ताकाला आयुर्वेदात तक्रम असे म्हणतात. ताक हे एक अमृत आहे कारण ताकाला अनेक प्रकारचे फायदे असतात. तसेच ताक कसे बनवितात याची सोपी रीतही आयुर्वेदात सांगितली आहे.
प्रथम दूध तापवून ते काही तासांसाठी थंड व्हायला ठेवून द्यावे. दूध थंड झाल्यावर दुधामधली साय काढून यावी. नंतर ते चांगल्या रीतीने घुसळून ते ठेवून द्यावे. दूध पूर्ण झाल्यावर लोणी वर येते. हे तयार झालेले लोणी बाजूला ठेवून तयार झालेले पाणी तसेच ठेवावे. अनेकदा दही तयार करताना कधी कधी दही चिकट अथवा कडवट होते. याचा उपाय म्हणजे दह्याचे हे भांडे स्वच्छ धुवून ठेवावे. जे स्वच्छ पाणी घेऊन त्यात लहानशी तुरटी दहा, बारा वेळा फिरवून ठेवावी व तसेच साधारण दहा मिनिटे ठेवून घ्यावी व नंतर फेकून द्यावे. आता दही तयार करण्यासाठी त्यात दूध ओतावे व एक दोन चमचे दही घालून ठेवून द्यावे. दही विरजण होण्याकरिता चार ते पाच तास लागतात व तोपर्यंत अगदी स्वच्छ व कवड्यासारखे दिसते. दही तयार झाल्यावर आपल्या मापाने थोडे दही भांड्यात ठेवावे. त्याचबरोबर ते उरलेले दुधाचे पाणी घालून ते चांगले घुसळावे. दही घुसळताना एकही दुधातील कवड दिसता कामा नये. हे दही तयार झाल्यावर ताक तयार होते.
ताकात थोडेसे हिंग, ठेचलेले आले लसूण व थोडेसे मीठ (सैंधव) घालून ते परत घुसळावे व त्यात थोडी कोथिंबीरची पाने टाकून सकाळी अथवा रात्री जेवताना द्यावे. ताक सकाळी व संध्याकाळी पिणे योग्य असते.
दही हे थोडेसे आम्लयुक्त असते. त्यामुळे त्यात लॅक्टीक अॅसिड नावाचे बारीक जंतू असतात. यालाच लॅक्टो बेसीलस असेही म्हणतात. आपण जेवत असताना खूप जंतू अथवा व्हायरस तयार होतात. ते जेवणात घातक असतात. जेवताना ताक प्याल्यास जंतू ताकामुळे विरघळून जातात व ते पोट स्वच्छ होते. ही ताकाची फार मोठी ताकद असते. त्या पोटाच्या अनेक विकारावर एकच उपाय म्हणजे ताक. ताकात अनेक औषधी गुण असतात. ते म्हणजे मेदवृद्धी नाहीशी होणे तसेच यात कॅल्शियम, पोटॅशियम तसेच व्हिटॅमिन बी १२ याचा समावेश होतो आणि प्रामुख्याने ताकाने पचन चांगले होते. ते ताकामुळेच आणि म्हणूनच याला अमृतमय ताक याच कारणामुळे म्हणतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply