नवीन लेखन...

आकाशवाणी कलावंत नीलम प्रभू अर्थात करुणा देव

नीलम प्रभू या माहेरच्या नीलम देसाई. त्यांचा जन्म २६ एप्रिल १९३५ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील हिरामण देसाई हे नाट्यदिग्दर्शक. त्यामुळे नाट्यकलेच्या वातावरणातच त्यांची वाढ झाली. नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.

त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता. नभोनाट्याच्या संपादनामध्ये त्यांचा हातखंडा होता. पु. ल. देशपांडे ह्यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मध्ये १९६२ ते १९७२ या काळात त्यांनी अभिनय केला होता. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातील रविवारची एक सकाळ ह्या भागातली त्यांची भूमिकादेखील चांगलीच गाजली होती.

आकाशवाणीवरील केवळ ‘प्रपंच’च नव्हे तर ‘आम्ही तिघी’ ह्यासारख्यां श्रुतिकांमधून किंवा ‘प्रकाश माक्याचे तेल’, ‘काय झालं? बाळ रडत होतं.’ यांसारख्या जाहिरातीमधून, आणि ’आपली आवड’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या निवेदिका आणि वृत्तनिवेदिका म्हणून त्यांचा आवाज रसिकांच्या चांगलाच परिचयाचा होता. शिस्तशीर स्वभाव आणि कामातील काटेकोरपणामुळे त्या आकाशवाणीतील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना त्यांच्याविषयी आदर होता. नीलम प्रभू यांच्या आवाजात एक वेगळाच तजेला होता. तो मधुर तर होताच पण नितळ आणि निरागसही होता. अनेक श्रीतिकांमधून त्यांचा आवाज लगेच ओळखू येई, पण त्या आपल्या आवाजातून आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेला असा काही चेहरा प्राप्त करून देत की श्रीत्यांच्या मनोमंचावर ती जिवंत होऊन जाई.

त्या निवृत्त झाल्यानंतरच्या काळात पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी ‘नाट्यदर्पण’ रजनीच्या कार्यक्रमात नभोनाट्याचे प्रात्यक्षिक घडवले, तेव्हा त्यातील लहान मुलाची भूमिका वठवताना करुणा देव यांनी आवाजाचा इतका प्रभावी व प्रत्ययकारक वापर केला की श्रीत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. अखिल भारतीय नाट्य परिषद, बोरिवलीने सुरू केलेल्या ‘स्वराभिनय’ पुरस्काराच्या त्या पहिल्या मानकरी होत्या. त्यांचा पहिला विवाह नाटककार बबन प्रभू यांच्याशी झाला होता. बबन प्रभू यांचे कालवश झाले. त्यानंतर नीलम प्रभू यांनी यशवंत देव यांच्याशी विवाह केला होता व करुणा देव झाल्या होत्या.

नीलम प्रभू यांचे ५ जून २०११ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..