नेणिवांच्या पलीकडे जाणिवांच्या आधी
फुलले क्षण भाव विभोर मनात काही
कसली चाहूल मनात काहूर का उठती
मीच मला शोधते हरवले अंतरी गुज काही
भाव कल्लोळ अंतरात मन ओढ कशाची
न कळत लोचनात आपोआप दाटे पाणी
मोगऱ्याचा घमघमाट अंतरात वेढून जाई
हसले लाजून कुणी ते लाजणे हृदयस्थ होई
स्पर्श मोहक खुणावतो निःशब्द काही
वेळूच्या बनी मुरली मोहक वाजे मोहवुनी
रंगाचे रंग खुलले भवताली रंगुन काही
शुभ्र धवल रंग खुलून जाई पिसाऱ्यातुनी
मनास काय हवे ते अलवार भाव टिपती
हृदयात मिटे हृदयस्थ शब्द भाव मिटती
स्त्रीच्या लाजेतही खुलतो गजरा सुकेशी
हास्य अलगद मुखी विलसते मग गाली
कोमल मधुर भाव अंतरात यावे उमलुनी
बहरात चांदणे न्हावे आकाश चांदण्यांनी
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply