३० डिसेंबर १९४३ रोजी आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी अंदमानमध्ये पोर्ट ब्लेअर शहरात प्रथमच ‘स्वतंत्र’ भारताचा ध्वज फडकवला व भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली या गोष्टीला आज ७८ वर्षे झाली.
१९४३ साली दुसरे महायुद्ध चालू होते. नेताजींनी जपान व जर्मन सरकारांशी संगनमत करून आझाद हिंद सेनेकडून ब्रिटिश प्रदेशावर आक्रमणे सुरू केली. या मोहिमेचा भाग म्हणून अंदमान-निकोबार द्विप समुह त्यांनी जिंकला.
या वेळी आझाद हिंद सेनेने पोर्ट ब्लेअरमध्ये ध्वज संचलन केले होते व सुभाष चंद्र बोस यांनी संपूर्ण लष्करी पोशाखात मानवंदना स्वीकारली होती. त्यावेळेस त्यांनी अंदमान निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज द्विप अशी नावं द्यावीत अशी मागणी केल्याचे सांगितले जाते.
हॅवलॉक बेटाचे नाव हे ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून देण्यात आले होते. २०१८ मध्ये या बेटांचे नाव बदलुन हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज बेट तर, नेल बेटाचे नाव शहीद बेट आणि रोस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस, असे करण्यात आले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply