निघून जरी जाशी,—
मम आयुष्यातुनी तू ,
तरी सारखा मागे उरशी,
लपलेल्या अंत:करणी तू ,—
तीर जसा वेगे शिरतो,
घायाळ करत अचानक,
तसा तू बाण बनतो,
छेद आरपार देत,–!!!
तो जसा बंबाळ करी,
पर्वा ना त्याला कुठली,
कोण त्याला थोपवी,
न कुणी त्यावर मात करी,
तसेच तुझे घुसणे,–
मम हृदयी, आंत आंत,
कितीदा नव्याने पुन्हा जगावे मरणच पाहे अगदी वाट,–!!! मुखवटे सुखाचे घालून सगळे,
आता थकावयांस होते,– मुखवट्यामागे काय दडले ते, कुणास काय ठाऊक असते,–? रात्रंदिन तुझे असे छळणे,
कुठवर मी आता सहावे,?
बरसात पोकळ सुखांची होता, त्यात किती कोरडे राहावे,–
तू स्वतःत नाहीस राहिला,
तितुका माझ्यात सामावला,—
दूर तरी कसे जावे,–
प्रश्न अनुत्तरीत राहिला,–!!!
हिमगौरी कर्वे ©
Leave a Reply