निळ्या मखमली ढगांवरती,
चला स्वार होऊ,—
डोळे भरून ही दुनिया,
पहात पाहत पुढे जाऊ,—
थंडगार हवेत त्या,
मेघांचे ओढून शेले,
हळूच दबकत, लपतछपत, सूर्यापासून दूर होऊ,—
उबदार त्या वातावरणी,
अलगद खेळत राहू,
मस्तमौला जगत जगत,
वरून डोकावून पाहू,—
खाली दिसती पर्वतरांगा,
नद्या कशा वाहती,
पर्वताच्या कुशीत कसे,
धबधबे खाली ओसंडती,—
थेंबांची नाजूक नक्षी,
कोसळते वरून खाली,
खालून बिंदूंची रांग बघा,
पुन्हा कशी वरती आली,
पाण्याची ही किमया केवढी,
वरून शोभिवंत दिसे,
काय काय आहे या जगी,
वरूनच नीट कळत असे, —
झाडे वृक्ष लता वेली,
वरून भासती संन्यासी,
तप”त्यांचे जाणून घ्या हो,.
सगळे समर्थ अतिशय किती,
माणसे दिसती मुंग्यांसारखी,
पशु पक्षी आणि प्राणी,
वरून पाहता सगळे छोटे,
मोठे तर नाहीच कोणी,
घरे शेते गावे शहरे,
दिसती वरून बघा छोटी,
का उगा गर्व”” माणसा,
माझे-तुझे करण्यासाठी
श्रेष्ठ कोण ते वरून कळते,
जेव्हा निसर्ग बहरतो,
कल्पना करूया तो नसता,
काय करू शकलो असतो,-?
स्वार्थापेक्षा मोठी ठरे,
अखिल चराचर सृष्टी,
देवघेवीतही माणूस कमी,
किती संकुचित दृष्टी,–?
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply