नवीन लेखन...

निमित्य गोकुळाष्टमी – जन्म नव्या ‘कृष्णा’ चा !

कृष्णा व्हा….!!!

कृष्णा – खरं तर हे एक असं नाव जे पुलिंगी आणि स्त्रीलिंगी वापरले जाते.
म्हणजे कृष्णा जसा सखा आहे तसाच सखी सुद्धा आहे.
पाठीराखा आहे तसा खोडकर आहे.

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी कृष्ण हवाच, या आशयाच्या पोस्ट या आधी वाचल्या सुद्धा असतील, जो मदत करतो, हात देतो, धीर देतो, अब्रू वाचवतो, शिष्टाई करतो, रण सोडून पळून जातो, रणांगणात हत्यार उचलत नाही, सारथी बनतो, सखी बनून खेळतो, खेळवतो…..

खूप काही करणारा एकतरी ‘कृष्णां’ प्रत्येकाच्याच आयुष्यात असलाच पाहिजे.
असं वाटतं ना ???
आपल्याला सुद्धा एक समजूतदार ‘कृष्णा’ मग ‘तो’असो वा ‘ती’, असायलाच पाहिजे अशी मनोमन इच्छा असतेच ना?

प्रत्येकाचेच उत्तर “हो” असेल…..

पण मी मात्र नेहमीच out of box विचार करतो….

आपल्या आयुष्यात कुणी कृष्णा बनून येईल, याची वाट पाहण्यापेक्षा किंवा तसा प्रयत्न करण्या पेक्षा…..

तुम्हीच का होत नाही कुणाचे “कृष्णा” ?

करून तर पहा न कुणाला तरी मदत,
देऊन बघा मदतीचा हात,
करून पहा शिष्टाई दुसऱ्या कुणासाठी तरी,
करून पाहा हत्यार न घेता युद्ध,
बना न कुणाचेतरी सारथी,
व्हा पुरुष असाल तरी सखी, आणि स्त्री असाल तरी सखा, कुणाचा तरी,

तुमच्या कडे आठरा विश्वे दारिद्र्य असलेले तुम्ही “सुदामा” असाल तरी कृष्णा कडे जाण्या पेक्षा, वीस विश्वे दारिद्र्य असलेल्या एखाद्या सुदाम्याचे कृष्णा व्हा…..

मुळात कृष्णा होणं च खूप कठीण आहे.
म्हणून आपण होत नाही, तेवढ्या यातना भोगण्याची आमची तयारीच नाही.
म्हणून कृष्णा ची वाट पाहत बसायची.

पण कृष्णा होऊन तर बघा, एक समाधान आहे त्या त्रासात….

तळ टीप :- तुमच्या आयुष्यात “कृष्णा” असेल तर हे तुमचं नशीब….
पण लक्षात ठेवा, त्या ‘कृष्णा’ ला सुद्धा नक्कीच एखाद्या “कृष्णा”ची गरज आहेच हं..

— विनोद डावरे, परभणी.
9765 998 999

विनोद डावरे
About विनोद डावरे 14 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..