नवीन लेखन...

निनावी

भीती वाटते लेखणी हातात घ्यायला,

 कोऱ्या कागदाने शाईच प्यायली तर?

पांढरा कागद निळा होईल,

कृष्णासारखा!
आणि झिरपेल त्यावर
माझी प्रत्येक भावना,
उघड होईल माझं मन,
आजवर दडवून ठेवलेलं फुलपाखरू.
लोक वाचतील,
चर्चा होतील,
टीका करतील,
थोरवी गातील माझ्या लेखनाची..
पण नकोय मला हे,
मला बोलायचंय
कुठल्याही मापात न झुकता,
कोणत्याही चष्म्यातून न पाहता.

कागद निळा झाला,
उतरली प्रत्येक भावना,
जखमेला घातलेला टाका उसवला,
आणि उरलं माझं रितेपण!
तितक्यात पाऊस आला,
माझ्या आसवांचा,
कागद भिजू लागला,
शब्द धूसर झाले,
स्वल्पविराम लोपले,
आणि लुप्त झाले पूर्णविराम!
कागद पुन्हा पांढरा झाला,
जुन्या ओळींच्या नकाशासह.
माझं मन पुन्हा सुखावलं,
शाश्वत,
चिरंतन वैगरे सगळं मिथ्या असतं,
सत्य असतो केवळ तो क्षण,
रसरसलेला,
टप्पोरा भरलेला,
माझ्या कोऱ्या कागदासारखा.
लिहीत असते मी त्यावर आवडेल त्या शाईने,
कधी जपून ठेवली जातात काही पानं,
तर काहींचा होतो निव्वळ चुरगळा!

Avatar
About जुईली आदेश म्हात्रे 2 Articles
जुईली आदेश म्हात्रे या कवियत्री आहेत. शब्दरांजण (shabdaraanjan.blogspot.in) या ब्लॉगवर त्या लिहितात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..