सोळाव्या शतकात रने देकार्त नावाचा एक थोर तत्त्वज्ञ फ्रान्समध्ये होऊन गेला. अतिशय बुद्धिमान असलेला देकार्त आपले तात्त्विक विचार त्याकाळी कोणालाही न भिता मांडत त्यामुळे काळातील असे. त्या कथासार धर्ममार्तंड व परंपरावादी मंडळी त्याच्यावर नेहमीच टीका करीत असत. कारण त्याचे आधुनिक विचार त्यांना पसंत नव्हते. देकॉर्नचे विचार जर लोकांना पटू लागले तर आपल्याला कोण विचारणार अशी भीती त्या मंडळींना सारखी वाटायची. त्यामुळे देकार्तवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नसत. पुढे पुढे तर त्यांच्या टीकेची जागा निंदेने घेतली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते देकार्तची निंदा करू लागले. मात्र त्यांची ही निंदा ऐकूनही देकार्त शांत असे; त्याने त्याबाबत कधीही कोणाकडेही तक्रार केली नाही. एके दिवशी मात्र देकार्तच्या हितचिंतकाला त्यांची निंदा सहन झाली नाही म्हणून त्याने देकार्तलाच विचारले की, तुम्ही तुमच्या टीकाकारांना (निंदकांना) खरमरीत उत्तर का देत नाही? त्यावर देकार्त शांतपणे आपल्या त्या हितचिंतकाला म्हणाला, ‘ निंदकांनी माझी सतत निंदा केल्यामुळे माझ्यामध्ये आपोआपच सहनशीलता व क्षमाशीलता हे गुण निर्माण झाले आहेत. त्यामुळे माझी मानसिक व बौद्धिक पातळी आणखी उंचावली आहे. ती एवढी उंचावली आहे की मला त्यांची निंदा आता ऐकूही येईनासी झाली आहे. त्यांची निंदा ऐकून त्यांना उत्तर देण्याचे मी ठरविले तर मला खालच्या पातळीवर यावे लागेल आणि तसे केल्यास मी माझेच नुकसान केल्यासारखे नाही का होणार?’ देकार्त यांचे ते उदात्त विचार ऐकून तो हितचिंतक भारावला व त्यांच्यापुढे नतमस्तक झाला.
-श्रीकांत नारायण
Leave a Reply