मनात, माझिया सहजची येते
निरागस! बाल्य पुन्हा परतावे
रुसुनिया हवे तेव्हडे हट्ट करावे
निरागस! बाल्य पुन्हा परतावे।।
सख्यासोबती, खेळावे भांडावे
रडुनीही, पुन्हा गळ्यात पडावे
हा खेळ आनंदी खेळण्यासाठी
निरागस! बाल्य पुन्हा परतावे।।
स्वार्थ, हव्यासाची नसे मनीषा
परमानंद! भाबडाभोळा केवळ
निष्पाप मैत्र, मनी प्रीतभावनां
ते निरागस बाल्य पुन्हा परतावे।।
सभोवती प्रांगण सारे मुक्तानंदी
न कधी द्वेष, असूया कधी मनी
बालपणीचे निर्मळ नाते आगळे
ते निरागस बाल्य पुन्हा परतावे।।
वृद्धत्वे! आठव सारे सोबतीला
भोगलेल्या सुखदुःखांच्या राशी
सांध्यसमयी अंतरी झरती जेंव्हा
ते निरागस, बाल्य पुन्हा परतावे।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ५०.
१७ – २ – २०२२.
Leave a Reply