गाभार्यातले ध्यानस्थ चिंतन……………
भक्ती आणि शक्तिचे एकत्रित मंथन……..
प्रकाशाने काळोखाला दिलेले मुक्त अलिंगन…………
असं काय असावं त्या गाभार्यामध्ये ज्यामुळे फक्त निरंजनाचं स्वरुप पाहुन मनामध्ये नितळ भावना निर्माण होते, पवित्रतेचा अर्थ कळतो, मनात चेतना निर्माण होते आणि अध्यात्माची चाहुल लागते. फक्त प्रकाशच?……नाही. तर तिथे आहे अग्नि ने धरलेले ज्योतिस्वरुपातले ध्यान………!
ध्यान………..
शब्द तर परिचीत आहेच पण नेमकं हे काय? हे ध्यान म्हणजे…
अज्ञानातुन ज्ञानाकडे़ जाण्यासाठी देहातल्या मनाने अलगद ओलांड्लेला उंबरठा…
जीवनाची रचना सुद्ंर बनवण्यासाठी मनाने निवड्लेली पाऊलवाट…
श्रद्धेत लपलेल्या सबुरीचे रुप…
समाधानाने स्विकारलेली समाधी…
तर असेही म्हणु शकतो कि भक्ती ने कळत-नकळत स्वीकारलेला मुक्तिचा मार्ग…आणि ही भक्ती जाग्रुत होते ती अंतर्मनातल्या मनःमुर्तीमध्ये…
मनामध्ये वास करणार्या या भक्तीची खुप वेगवेगळी रुपे आहेत. ज्यांना आपण एकाग्रता, आत्मविश्वास, स्मरण, इच्छा, कल्पना, ग्रहण, बुद्धी, प्राण आणि गुरु या रुपाने ओळखतो. या सर्व भक्त्या जिवंत करते ते ध्यान….. आणि जेव्हा या सर्व भक्त्या जिवंत होतात तेव्हा घडुन येते ते एक सुंदर व्यक्तिमत्व, एक लोभस चरित्र…. आणि नष्ट होतो तो अहंकार, क्रोध, मोह, ईर्ष्या, वासना, तणाव, आळस, कुटीलता आणि असे बरेचसे अवगुण ज्यामुळे विचारांमध्ये विक्रुतीपणा येऊन आचणातल्या क्रुती चे वळण चुकते. म्हणूनच जीवनाचे व्यवस्थापन जाणुन घेण्यासाठी, स्वतःमधल्या स्व त्वाला ओळखण्यासाठी “निरंजन” घेऊन येत आहे एक वेगळी गाथा, एक वेगळी कथा….
आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!
— स्वाती पवार
Leave a Reply