“वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरींचे” त्यातली ही ओळ “अन्न हे पूर्ण ब्रह्म”.
विद्यालयात असताना वर्गामध्ये काही तास झाले की, मध्यांतर म्हणून मधली सुट्टी व्हायची. एकत्र सर्वजण उभे राहून आम्ही जेवणाआधीचा हा श्लोक म्हणायचो. त्यावेळी इतकच माहित होतं कि ही प्रार्थना म्ह्णुन मग जेवायचे असते. पण खरा अर्थ काय? हे आता कळले.
अन्नामध्ये ब्रह्म ऊर्जा आहे, जी आपलं आरोग्य सकस ठेवण्याच मदत करते. आपल्या देहाला शक्ती मिळवून देते. अन्न ग्रहण करण्याआधी केलेल्या या प्रार्थनेची भावना ही अशी की, “हे देवते, “हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावनेने मी ग्रहण करीत आहे या प्रसादा मधून मला शक्ति व चैतन्य लाभो, हीच आपल्याशी प्रार्थना”.
वदनी कवळ घेता , नाम घ्या श्रीहरीचे ||
सहज हवन होते, नाम घेता फुकाचे ||
जीवन करी जिवित्वा, अन्न हे पूर्णब्रम्ह ||
उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ||
श्री समर्थ रामदासांनी रचलेल्या या सुंदर ओळींचा अर्थ असा की “मुखी अन्न ग्रहण करते वेळी नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी कोणतेही मूल्य लागत नाही. याउलट नामस्मरणामुळे सहजपणे आपल्याकडून एक हवन (होम) घडते. शरीराला ऊर्जा मिळवून देणारे आणि स्फूर्ती मिळवून देणारे, हे अन्न साक्षात परब्रम्ह आहे. अन्नग्रहण करणे म्हणजे नुसते पोट भरणे नव्हे तर तो एक यज्ञ कर्म आहे हे जाणून घ्यावे”.
— स्वाती पवार
Leave a Reply