आपल्या मनामध्ये सतत एक विचारधारा कायम स्वरूपी सुरू असते आणि त्यात वेगवेगळे विचार असतात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक.
सकारात्मक विचार म्हणजे सद्विचार, ज्यामुळे आपले चरित्र सुंदर बनते. व्यक्तिमत्व सुंदर घडते. मनामध्ये असलेल्या चांगल्या विचारांचा ठेवा सदैव आपल्या आचरणाला एक वेगळी वाट मिळवून देतो. आपलं आचरण हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. दिवसभरात केलेल्या विचारांवरच आपली कृती अवलंबून असते आणि त्यावरच आपलं आचरण अवलंबून असतं पण या चांगल्या विचारांचा ठेवा निरंतर आपल्या सोबत राहत नाही. बरेचसे असे प्रसंग दिवसभरात घडतात ज्यामुळे आपल्या विचारांची वाटचाल एक वेगळे वळण घेते आणि विचारांची जुळून आलेली शृंखला क्षणात खंडित होते. हा खंड क्षणात विस्कळीत करतो आपल्या विचारांना.
हे क्षणात विचारांना परावर्तित करणारे वळण जर आपण संतुलित राहून सांभाळले तर आपले सदविचारही आपल्याला सोडत नाहीत. म्हणूनच सद्विचार हा थोर सोडू नये तो… कारण सदविचारच आनंदाला प्रत्यक्षात आपल्या जीवनात कसे आणायचे ते शिकवतात.
— स्वाती पवार
Leave a Reply