नवदुर्गेचा तिसरा अवतार हा माता चंद्रघण्टा….
चंद्रघण्टा मातेच्या मस्तकावर चंद्र सुशोभित आहे आणि मातेच्या हाती नाद करण्यासाठी घण्टावादय आहे. माता चंद्रघण्टा या साक्षात ध्वनिमुर्ती आहेत.
असुर महिषासुराच्या उन्मत्तपणाला त्रस्त होऊन, देवांनी केलेल्या प्रार्थनेला स्वीकारून आणि त्रिदेवांच्या साक्षीने मातेने नऊ दुर्गेचा अवतार धारण केला आहे. असुर महिषासुरासोबत युद्धाला प्रारंभ करण्याआधी मातेने विजेहुनही कितीतरी अधिक पटीने शक्तिशाली असा कंपनात्मक घंण्टेचा नाद केला होता. त्या आवाजामु़ळेच असुर सेना उध्वस्त झाली होती. नष्ट झाली होती. त्या आवाजामुळेच असुरांमध्ये भय निर्माण झाले होते. या भयनादामुळेच असुरसेनेची असुरी ऊर्जा ही कमकुवत झाली आणि संपुर्ण देवलोकांमध्ये समाधानाचे दृश्य दिसून आले.
चंद्रघण्टा मातेचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये संकटावर मात करण्यासाठी मनाला लागणारी जागृती निर्माण होते. या मातेचे ध्यान आपल्यामध्ये सामर्थ्यासोबत सजगता निर्माण करते.
— स्वाती पवार
Leave a Reply