नवदुर्गेच्या अवतारांमधील मातेचा चौथा अवतार हा कुष्माण्डा मातेचा आहे…
कुष्मांड म्हणजे कोहळा. ज्याप्रमाणे कोहळ्यामध्ये अनेक बिया असतात आणि त्या प्रत्येक बी मध्ये अनेक कोहळे उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते. असे या कुष्मांडा मातेचे उत्पत्ती स्वरूप आहे. उत्पती, निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे.
या मातेची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजाधारी आहे. सर्वत्र अंधकार असताना आणि सॄष्टीचे अस्तित्व नसताना या आदिशक्ती कुष्माण्डा मातेने ध्यान करुन ब्रह्मांड निर्माण केले. म्हणुन या मातेला देवी आदिमाया देखील म्हणतात.
कुष्माण्डा मातेचे ध्यान केल्यामुळे मन शुद्ध होते. मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढते. मन तेजस्वी होते.
— स्वाती पवार
Leave a Reply