भविष्यातली एक गोड रचना…स्वतःबद्दल, एखाद्या परिस्थितीबद्दल तर कधी कोणा इतरांबद्दल…इच्छा खुप असतात. चांगल्यादेखील आणि वाईटदेखील…… इच्छा चांगली असेल तर आपण आपल्या सोबत इतरांचेही चांगलेच होते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र आपल्यासोबत दुसर्यांचेही वाईटच होते…इच्छेचे मुळ स्वरुप हे आपल्या विचारांवर अवलंबुन असते जसे मनातुन निर्माण झालेल्या चांगल्या विचारांतुन आपण आपली संस्क्रुती दर्शवतो आणि निर्माण झालेल्या वाईट विचारांतुन आपण आपली विकुती….
“इच्छा असेल तर मार्ग दिसेल” असं खुप वेळा आपण ऐकतो. जेव्हा मनातुन एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असो तिला मार्ग हा आपोआपच खुला होत जातो. कितिदा तरी आपण हे अनुभवतो की कधी कोणाची खुपच मनापासुन आठवण काढली कि ती व्यक्ती अचानकच आपल्या समोर येते आणि आपण लगेचच उद्गारतो, “योगयोगच म्ह्णावा, आत्तच आम्ही आपली आठवण काढली”. प्रत्येकाच्या मनात एक तरी अशी इच्छा असतेच जी सदैव जाग्रुत असते. त्याच इच्छेच्या बळावर आपण आपल्या भोवतालची परिस्थिती निर्माण करत असतो.
अध्यात्मातली अशीच एक इच्छाभक्तीवरची, श्री विष्णु अवतार, श्री वामन यांची कथा……कथा दानवीर राजा बळीची………..एके काळी राजा बळीला तिन्हीलोक जिंकण्याची इच्छा झाली होती. त्याप्रमाणे ध्यान साधना करुन राजा बळीने तसा श्रेष्ठत्वाचा आशिर्वाद देखील मिळवला होता. राजा बळीने आपल्या श्रेष्ठत्वाने पाताळ लोक आणि प्रुथ्वी लोक हे जिंकलेच होते पण तरिही समाधान मात्र नव्हते. इतके सर्व घडल्यानंतरही राजा बळीने देवलोक जिंकण्याची परम इच्छा मनी बाळगली आणि त्या प्रमाणे ती इच्छा पुर्ण होण्यासाठी राजा बळीला एक यज्ञ करावे लागणार होते. या यज्ञामध्ये राजा बळीला आपल्या पत्नीसोबतच यज्ञ करावे लागणार होते. यज्ञपुजेची तयारी सुरु झाली. लगेचच या सर्व गोष्टींची कल्पना देवलोकांना झाली. सवे देवांना बळीराजाचे ही इच्छा मान्य नव्हती. पण त्यांना हा ठाम विश्वास होता की यावर मार्ग हा त्रिदेवांकडुनच निघेल. त्याप्रमाणे श्रीविष्णुंनी ही जबाबदारी घेतली. इथे पुथ्वीलोकांत राजा बळीने आपल्या पत्नी सोबत यज्ञपुजा सुरु केली. अखंड यज्ञपुजा सुरु असतानाच तिथे महालापाशी एक याचक येऊन उभे राहीले. राजा बळीकडुन कोणीही रिकाम्याहस्ते परतत नव्हते याची महती सर्वांनाच होती. पृथ्वीवर आणि पाताळलोकांत महान दानवीर म्हणून राजा बळीचे नाव प्रसिद्ध होतेच त्याशिवाय राजा बळी हे वचनाचे पक्के आहेत हेही सर्वांना माहीत होते. आलेल्या याचाकाचे रुप हे खुपच तेजस्वी होते. त्याक्षणी तयाचकाची हाक ऐकुन यद्न्य थांबवून त्या याचकाजवळ जातात आणि पाहतात तर एक बटुक रुपामध्ये एक याचक राजा बळीच्या समोर येउन उभे राहतो. राजा बळी आणि त्यांची पत्नी एकटक या रुपाकडे पाहतच राहतात. क्षणातच राजा बळीच्या पत्नीच्या मनी एक प्रबळ इच्छा व्यक्त होते. तिचे ध्यान त्या बालबटुक रूपावर लागते आणि ती मनातल्यामनात बोलु लागते, ” जर असे माझे मुल असते तर याच क्षणी मी त्याला स्तनपान करु करविले असते” समोरच उभे असलेले श्री विष्णूरुपी वामन ही इच्छा जाणतात आणि आपल्या लीलेप्रमाणे राजा बळीजवळ तीन पाऊले जमीन दानाच्या स्वरूपात मागतात.
श्री वामनांची ही मागणी राजा बळीच्या गुरूंच्या मनाला एक वेगळाच संकेत देत होती, म्हणून त्यांना अशी खात्री पटत होती कि ही कोणतीतरी वेगळीच लीला आहे. गुरूंनी वेळीच राजा बळीला याची कल्पना दिली पण राजा बळीला आपल्या अहंकारापुढे ती तीन पाऊले जमीन फारच लहान वाटली. राजा बळी ने होकार देतात श्री विष्णूंनी आपल्या लीलेची सुरूवात केली. त्यांनी आपल्या शरिराला इतके मोठे केले कि जेणेकरून त्यांच्या एका पावलामध्ये एक संपूर्ण लोक सामावून जाईल. अशा प्रकारे फक्त दोन पावलांमध्ये राजा बळीने जिंकलेले सर्व काही दान झाले आणि तिसरे पाऊल ठेवण्यासाठी राजा बळीने श्री वामनांनी आपले मस्तक पुढे केले. तिसरे पाऊल ठेवल्यावर राजा बळी पाताळलोकी गेले …हे दृष्य पाहताच राजा बळीच्या पत्नीच्या मनात दुसरी इच्छा व्यक्त झाली ती अशी कि “जर असे खरेच माझे मुल असते तर याच क्षणी मी त्याला दुधात विष कालवून स्तनपान करविले असते” ही इच्छा ही श्री विष्णूरुपी वामनांनी जाणली …. राजा बळीच्या पत्नीच्या मनात बाळगलेल्या दोन्ही इच्छा श्री विष्णूंनी कृष्ण अवतारात पूर्ण केल्या … त्यावेळी राजा बळीच्या पत्नीचा जन्म राक्षसी पुतना म्हणून झालेला होता … आणि त्या कथेशी आपण सर्वच परिचीत आहोत …
म्हणजेच अंतर्मनातली इच्छा ही परिपूर्ण होते …
शास्रानुसार सिद्ध झालेल्या कुण्डलीनी ध्यानामध्ये सर्वात प्रथम जे चक्र आहे त्याला मुलाधार चक्र असं म्हणतात, आपला मूळ असा आधार … इच्छा जाग्रुत करणारे शरीरातील प्रथम स्थान … मुलाधार चक्राला घेऊन अशा बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना आहेत पण खरेतर इच्छेवर योग्य तो निर्णय घेणं हे या ध्यानातुनच शक्य होतं …
चंचल अशा इच्छा जेव्हा योग्य पद्धतीने स्थिर होतात तेव्हाच त्या पूर्ण होतात. आणि स्थित होण्यासाठी महत्त्वाचे आहे इच्छाभक्ती ध्यान …
_स्वाती पवार
Leave a Reply