माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे.
महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले.
एकेकाळी महर्षी कात्यायन यांनी माता भगवती पार्वती मातेचे ध्यान केले होते. त्यांच्या ध्यानावर प्रसन्न होऊन मातेने त्यांना वरदान मागण्यास सांगितला होता तेव्हा त्यावेळी महर्षी कात्यायन यांनी मातेला आपल्या घरी कन्या रुपाने येऊन सहवास करण्याची प्रार्थना केली. महर्षी कात्यायन यांच्या ध्यानाचे फळ म्हणून मातेने आशिर्वाद स्वरुपात त्यांच्या घरी सहवास केला. महिषासुराचा वध जवळ आलेला होता.
महर्षीं कात्यायन यांच्या घरी मिळालेले ममत्व आणि माया सोडून आपल्या योजनेला परिणाम देण्यासाठी माता जेव्हा निघत होत्या तेव्हा महर्षींच्या सेवाभावाने त्या अतिशय प्रसन्न होत्या. आशीर्वाद स्वरुपात महर्षी कात्यायन यांना माता म्हणतात, “अखंड सृष्टीमध्ये माझा अवतार तुमच्या नावाने म्हणजेच कात्यायन महर्षींची कन्या कात्यायनी म्हणून प्रसिद्ध राहील”.
— — स्वाती पवार
Leave a Reply