नवरात्रीमधल्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची आराधना केली जाते.
सिद्धीचा अर्थ आहे भव्यदिव्य अश्या अलौकिक शक्त्या आणि दात्री म्हणजे दाता, प्रदान करणारी…
भव्यदिव्य शक्त्या प्रदान करणारी ही देवी सिद्धिदात्री माता…. सिद्धिदात्री माता म्हणजेच साक्षात आदिमाया…
अंधकाराने व्यापलेल्या या विश्वामध्ये एक स्वयंसिद्ध प्राणज्योत उत्पन्न होते आणि आदिशक्तीची निर्मिती होते. या आदिशक्ती मातेकडुनच हरि, ओम आणि ब्रह्म जन्म घेतात आणि अखंड सृष्टीला साकारतात. त्रिदेवांना आपले कार्य सिद्ध करण्यासाठी सिद्धिदात्री मातेने त्यांना अष्टसिद्धी शक्त्या अर्पण केल्या आहेत. मातेचे या स्वरूपाचे ध्यान केल्यामुळे आपले मन क्रोध, अहंकार, तणाव, ईर्ष्या, मोह, लोभ आणि वासना यांसारख्या अनेक नकारात्मकतेमधुन मुक्ती मिळवते आणि पंचातत्वातील सिद्धी प्राप्त करते.
बलाढ्य अशा महिषासुरासारख्या असुरी शक्तीचा वध नवरात्रीतील या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी झाला. अष्टसिद्धी असलेला महाशक्तिशाली असा हा अवतार म्हणजेच माता सिद्धिदात्री.
— स्वाती पवार
Leave a Reply