हि उग्र वासाची गुल्म वनस्पती आहे.हिचे २-४ सेंमी उंचीचे क्षुप असते.ह्याच्या पानांच्या कडा दंतुर अथवा अखंड असतात.पाने मागच्या बाजुस पांढरी लव युक्त असतात व गुळगुळीत असतात.साधारेण पणे एका वृन्तावर ५-१५ सेंमी लांबीच ३-५ पत्रके असतात.फुले लहान व गुच्छ युक्त पांढरी किंवा निळी असतात.फळ गोल व पिकल्यावर काळे दिसते.
ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बिया,पंचांग,मुळ.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.निर्गुण्डी चवीला कडू,तिखट,तुरट असते.हि उष्ण गुंणाची असून हल्की व रूक्ष असते.हि वातकफनाशक व पित्तकर आहे.
चला आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊ:
१)वेदना व सूज असणाऱ्या भागावर निर्गुण्डीची पाने गरम करून बांधतात.
२)घसा दुखणे,तसेच तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्यात निर्गुण्डीच्या काढ्याने गुळण्या करतात.
३)आमवातामध्ये दुखणाऱ्या सांध्यांवर निर्गुण्डीच्या पानांचा रस लावतात.
४)डोकेदुखी,डोके जड होणे,ह्यात निर्गुण्डीच्या पानांची चटणी डोक्यावर बांधतात.
५)निर्गुण्डी केस व डोळ्यांच्यानआरोग्यास उत्तम आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply