निर्मोही गुंतावे
स्वांत सुखाया
लाभते मन:शांती
अंतरा सुखाया….
सुखदुःख क्षणाचे
संवेदनांची छाया
हाच जन्म मानवी
जगुनीया जगवाया….
खेळ सारे भावनांचे
भावशब्दात गुंफाया
जपावित मनेमने
अंतरंगा जाणुनिया…..
सावरीत जीवाजीवा
सुखवावी मन:काया
अशाश्वती स्पंदनांची
सारी मृगजळी माया….
सत्य एक अनामिक
त्याची कृपाळू छाया
नित्य त्याला भजावे
तोच येतो सावराया….
— वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२३
२/९/२०२२
Leave a Reply