नवीन लेखन...

निर्णय क्षमता

माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात. निर्णय घेता न येणे बुद्धीहीनता आहे,तर काहीही निर्णय घेणे मूर्खपणा आहे.योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर यश हमखास लाभते,केवळ निर्णय न घेतल्याने खुप गमवावे लागते.

लहानसहान गोष्टींत देखील निर्णय घ्यावे लागतात.वस्तूंची किंवा माणसांची निवड करणे ह्याचे निर्णय घ्यावे लागतात.लग्न करायचे की नाही, पैकी कोणती मुलगी पसंत करायची निर्णय घ्यावा लागतो.

कोणता मार्ग निवडायचा,दारू सुरू करायची की सोडायची, संन्यास घ्यायचा की प्रपंच, कुणाशी बोलायचे, कुणाशी अबोला धरायचा निर्णय घ्यावे लागतात.निर्णय हे निर्णायक ठरावेत इतके अचूक असले पाहिजेत. निर्णय चूकला तर नेम चूकल्यासारखे होते.बहुतेक अपयश हे चूकीचे निर्णय घेतल्याने होते.घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप झाल्याची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. अधिकारी, प्रशासन व शासन सतत निर्णय घेत असतात.जो योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो,तो उत्तम शासक अथवा प्रशासक ठरतो.काय निर्णय घ्यावा असे ज्यास समजत नाही,तो अधोगती करतो .एकतर
निर्णय घ्यावा हेच कळत नाही आणि पुन्हा काय घ्या हे पण कळत नाही, असे न कळणारी माणसे प्रशासक किंवा शासक म्हणून कमकुवत असतात.निर्णय क्षमता नसेल तर इतर क्षमता कुचकामी ठरतात.सर्व उपलब्ध असून केवळ निर्णय न घेतल्याने अतोनात नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत.

काही निर्णय तात्काळ घ्यावयाची असतात, विलंबाने ती व्यर्थ ठरतात, उशीराने सुचलेले शहाणपण हा मूर्खपणा असते.अनेक ड्रेस असले तर कोणत्या प्रसंगी कोणता परिधान करू ,हा निर्णय घ्यावा लागतो. जीवनात प्रत्येक प्रसंगी निर्णय घ्यावा लागतो.निर्णयाविना कोणताही बदल होत नाही.निर्णय घेण्यासाठी आकलन असावे लागते.निर्णय उपाययोजना असते,ती दूरदृष्टी असते. निर्णय जसे स्वतः घ्यायचे असतात, तसे इतरांशी चर्चा करुन त्या निर्णयाचे सर्वांगीण मंथन व्हायला पाहिजे.मोठे निर्णय थोडे विलंबाने परंतु सार्थकी लागतील इतके अचूक असले पाहिजे.निर्णय घेण्यासाठी चालढकल कधीच योग्य नसते. एकंदरीत आपल्या जीवनात निर्णय निर्णय प्रक्रियेचे खुप महत्व आहे.निर्णय क्षमता ही खूप महत्त्वाची क्षमता आहे, ज्याच्या ठायी ती आहे,अशी माणसे शासक आणि प्रशासक असावीत, म्हणजे प्रगती साधता येईल.

– ना.रा.खराद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..