नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग दहा

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सोळा

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

आप्त म्हणजे ज्याला आपली निरपेक्ष काळजी आहे.
अशी अनेक मंडळी आपल्या आसपास असतात, ज्यांना आपली काळजी वाटते. पण ही माणसे कधीच समाजासमोर येत नसतात. पडद्यामागून आशीर्वाद देण्याचे काम करत असतात.

अशा मंडळींना संत असे म्हणतात. यांनी त्यांचे चांगले विचार स्वतःमध्ये एवढे रूजवलेले असतात, की त्यांच्या संपर्कात जे येतील, त्यांनाही चांगला विचार करणे भाग पडते. या संपर्काला सत्संग म्हणतात.

यांना ओळखायचे कसे ? हे आपल्या सान्निध्यात आले की, यांची वंदावी पाऊले…, …तोची दिवाळी दसरा, असे आपल्याला वाटले पाहिजे ते संत.

ग्रंथकार असे म्हणतात, की सतत यांच्या सेवेत राहिले म्हणजे आरोग्य मिळते. यासाठी आप्त-उपसेवित असा शब्द शास्त्रकार वापरतात.

सेवा असोत वा उपसेवा म्हणजे इथे कुणाचे पाय चेपणे, त्यांच्या घरची बाजाररहाटादि कामे करणे, त्यांची सतत चमचेगिरी करणे नव्हे, ही असली कामे तर राजकारणी लोकांचे फंटर देखील करत असतात. किंवा पेड सर्व्हंटदेखील करत असतात. सेवा या शब्दाचा त्याहीपेक्षा वेगळा अर्थ इथे अपेक्षित आहे.

आपल्या अवतीभवती वावरणाऱ्या अशा संत लोकांमधील आप्त असण्याचे गुण शोधणे, आणि सतत ते गुण आपल्या अंगी आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे म्हणजे सेवा.

संत म्हणजे प्रत्येक वेळी भगवे कपडे, गळ्यात रूद्राक्षांच्या माळा, कमंडलू घेतलेले, सर्वसंग परित्याग केलेले, घर दार सोडून, बायको मुलांना टाकून, हरिहरि करत असतात असे नाही. तर अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन, तिन्ही लोक. ऐसी मती जयाची स्थिर असे सज्जन लोक हे पण आप्तच असतात.

अशी मंडळी प्रसिध्दीपरान्मुख असतात. आतून बाहेरून वेगळे नसतात. सतत सकारात्मक विचारात असतात. त्यांचे विचार त्रिकालाबाधीत स्थिर असतात, बोलणे कमी आणि कृती जास्त असते.

बाह्यलक्षणावरून यांना ओळखता येत नाही. त्यासाठी तशीच संतदृष्टी असावी लागते. तरच ते आपल्या आत प्रकट होतात. आणि चांगले विचार करायला लावतात. कारण ते आपले असतात. आप्त असतात.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०५.०८.२०१७

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..