नवीन लेखन...

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेहेतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

बाबा सांगतात…

नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

अष्टांग ह्दय या ग्रंथातील सूत्रस्थानातील चौथ्या अध्यायातील सर्वात शेवटच्या या श्लोकाचाच एक भाग म्हणून त्याअगोदर काही कायिक वाचिक मानसिक पथ्यापथ्ये सांगितलेली आहेत. जी “आई सांगते” या धर्तीवर आधारलेली होती.

समाजात वावरताना कसे वागावे, याचे काही ढोबळमानाने नियम ठरवून दिले आहेत. जे आजही योग्य वाटतात. हे नियम आईच समजावून सांगू शकते. जसे ग्रंथकार म्हणतात, रस्त्याने जाताना आपल्याकडे इतरांचे लक्ष असते, तेव्हा आपले कपडे नीटनेटके असावेत. जुने, मळलेले, लालभडक रंगाचे, फाटलेले कपडे घालू नयेत.
(वासोनधारयेत जीर्णम् मलिनं रक्तम् उल्बणम् )
दुसऱ्याने वापरलेले कपडे आपण वापरू नयेत, केवळ कपडेच नव्हेत तर फुले, पुष्पमाला, कंठहार, दागिने, अंगठ्या, चप्पल इ.इ. वापरू नये.
काय चुकले हो आईचे ? हे आज सांगण्याची काय आवश्यकता आहे, असे काही जणांना वाटेल.

आज पहा काय चालले आहे, जीन्सची पॅन्ट विकत घ्यायची ती पण मळकट, कळकट, मुद्दाम फाटलेली, जेवढी मळकी तेवढी म्हणे फॅशन.

एखाद्याचा सुरू असलेला मोबाईल काॅल जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा तो चार वेळा पुसुन घेतो, कशासाठी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून! हे आपल्याला कळते, पण ओढणी, रुमाल, नेलपेंट, साबण, इयरींग, टिकल्या इ. वस्तु आपण सहजपणे एकमेकांच्या वापरत असतो. असे करू नये. असेच ग्रंथकार देखील सांगत आहेत. ते मी फक्त आईच्या तोंडी घातले एवढेच.

आता या मागील अध्यायामधे वर्णन केलेली काही सूत्रे पाहूया. त्यांना आपण बाबा सांगतात, या मथळ्याने अभ्यासूया.

सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः।
सुखंच न विना धर्मात् तस्मात धर्मपरो भवेत् ।

सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखाकरीता चालले आहेत.आणि सुख तर धर्मावाचून नाही. म्हणून निरंतर धर्मपर असावे.

हे असे सर्व वर्णन आयुर्वेदात सांगितलेले आहे का, असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यांच्यासाठी खास हे ससंदर्भ सदर.

आई जे सांगत होती, ते सुद्धा सुखासाठीच होते. फक्त तिथे व्यष्टी होती. बाबा काही सुखप्राप्तीच्या गोष्टी सांगताना समष्टीचा विचार करतात. शब्द वेगळे असतील पण भाव तोच आहे. काळ बदलला, पण सुखाची व्याख्या तीच आहे.

अनुकुल वेदनीयम् सुखम्
प्रतिकुल वेदनीयम दुःखम्

अशा अनुभूती ज्यांने अनुकुलता म्हणजे बरे वाटणे, असे अनुभवता येते, ते सुख.
आणि अशा अनुभूती, ज्यांनी प्रतिकुल म्हणजे बरे वाटत नाही, अशी संवेदना निर्माण होण्याला दुःख असे म्हणतात.

इंग्रजी भाषेत वर्णन करायचे झाल्यास फीलींग वेल इज सुख आणि नाॅट फिलींग वेल इज दुःख ! नाॅट फिलींग वेल म्हणजे रोग. आणि फिलींग वेल म्हणजे निरोग.

म्हणजेच निरोगी असणे हेच सुख आणि रोगी अवस्था म्हणजे दुःख.

म्हणजेच आपली धडपड निरोगी रहाण्यासाठी चाललेली आहे. आणि त्यासाठी शास्त्रकार सांगतात, धर्मपर रहा. हिंदीत सांगायचे झाल्यास, नेकीसे रहो।
काही जणांना धर्म शब्दाचीच अॅलर्जी आहे. त्यांच्यासाठी हिंदीतील अर्थ सांगितला.

धर्म म्हणजे विशिष्ट रंग अपेक्षित नाही. सरळ सांगायचे झाल्यास हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन बौद्ध असे न म्हणता आपले विहित कर्म करणे म्हणजे धर्म होय.

धारणात धर्मः अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. पण आम्ही व्याख्या आणि व्याकरण सुद्धा मानणार नाही, असे म्हणणाऱ्या मंडळींना काय म्हणावे ?

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..