तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम देवा तिजला
दूरवर बघत राहीन ती लेकीला
लेक चालली निरोप घेवूनी सासरी
भरल्या नयनी माय उभी शांत दारी
जड पावले पडता दिसती लेकीची
ओढ लागली त्याच पावलांना मायेची
उंचावूनी हात हालवीत चाले लेक
जलपडद्यामुळे दिसे तीच अंधूक
वाटेवरूनी जाता जाता दृष्टीआड झाली
अश्रूपूसून पदराने माय घरात आली
दूर गेले पाखरू ते आकाशी उडून
स्वैर जगण्या आपल्याच परि पंख फूटून
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply