रसर क्षणक्षण सरता
वर्षानुवर्षे सहजी सरती
भाळी भोग सुखदुःखांचे
चिरंजीव साऱ्याच स्मृती
निसर्गाची सारी किमया
अखंड कालचक्राची गती
स्मरणाचेच दान जीवाला
सत्कर्माचे संचित सदगती
सद्गुणांना रुजवीत जावे
सद्भावनां! सुखदाच अंती
क्षण! हरविले उरी जपावे
उसवित रहाव्या गतस्मृती
नवे वर्ष, ही नवी पालवी
ईश्वराची अगम्य अनुभूती
आनंदाने सुस्वागत करावे
हीच जीवनाची फलश्रुती
— वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र. १६४
३१ – १२ – २०२१.
Leave a Reply