गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे
अगदी निर्विकार जणु ओळखच नाही
न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे
जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही
मग्न असती सारेच आपुल्या विचारात
इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही
स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो
अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही
मी भला, माझे भले नको कुणी दूसरे
आता नाते सहृदयी कुठेच उरले नाही
भावनां शुष्क कोरडया, रुक्ष नाती सारी
आता ओलावा अंतरीचा दिसतच नाही
संवादाविण कां ? जीव हा सुखात जगतो
सांगावे कसे कुणास हेच कळतच नाही
***********
–वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३१६
१/१२/२०२२
Leave a Reply