सोळा वर्षांचा ज्ञानोबा
महाकवी झाला,
गीतेंवरी टिपणी लिहून
मुकुटमनी ठरला ।।१।।
गजाननाचा आशीर्वाद
लाभला त्याला,
ज्ञानेश्वरीचा प्रवाह
हातून वाहूं लागला ।।२।।
अष्टावक्र दिसे विचित्र
परि महागीता रचली,
अकरा वर्षाच्या मुलानें
मान उंचावली ।।३।।
विटी दांडू खेळत असतां
काव्य करुं लागला,
शारदा होती जिव्हेवरती
ज्ञान सांगू लागला ।।४।।
निसर्गाची रीत न्यारी
चमत्कार तो करीतो,
भव्य दिव्यता दाखवूनी
अस्तित्वाचा प्रत्यय देतो ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply