धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी,
तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१,
बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे
यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२,
नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने
सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३,
जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी
पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४,
प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची
आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५,
मृत्यूच्या त्या दाढे मधूनी, एक सुटून जातां
मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्व जगण्या करिता….६,
जगण्यासाठी मृत्यू आणि मृत्यूमुळेच जगणे
निसर्गाचे चाले अविरत हेच ते खेळणे….७
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply