आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे
त्या वाटेवरी चालत रहा, आवाहन त्याचे…..१
चालत राहती जे जे कुणी, त्यावरी विसंबूनी
यशस्वी होती तेच जीवनी, समाधान लाभूनी….२
कर्ता समजूनी काही काही, अहंकारी होती
सुख दु:खाच्या चक्रामध्ये, तेच सापडती….३
भटकत जाती भिन्न मार्ग, काही कळापरि
परिस्थितीचे चटके बसता, येती वाटेवरी….४
हिशोबातील तफावत ही, दु:खाचे कारण
नजीक जाता आखल्या मार्गी, सुखी होई जीवन….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply