कितीही सारी धडपड करशी,
लाचार ठरतो अखेरी,
जाण माणसा मर्यादा तव,
आपल्या जीवनी परी ।।१।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी,
जीवन असे तुझे सारे,
पतंगा परि उडत राहते,
जसे सुटत असे वारे ।।२।।
निसर्गाच्याच दये वरती,
जागत राहतो सदैव,
कृतघ्न असूनी मनाचा तूं,
विसरून जातो ती ठेव ।।३।।
निसर्गाच्या मदती वाचूनी,
जगणे शक्य नसे तुजला,
जीवन कर्में करीत असतां,
आठवित जा प्रभूला ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply