अव्यक्त, निःशब्दी मौन
मिटलेले निरागस डोळे…
सांग कसे मी समजावे
हितगुज तुझ्या मनातले…
नित्य तुझीच गं आठवण
मन्मनी प्रीतभाव गुंतलेले…
हेची सत्य अजुनही उरात
मग शब्द अबोल कां झाले…
जीवास, प्रीतदान भाळीचे
मन भावनांत कां उगा गुंतले…
सखये बोल नां सत्य एकदा
सांग नां तूं तुझ्याच मनातले…
होवू दे मनहृदय शांत आता
कळू दे प्रीतभाव लोचनातले…
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२६६
२०/१०/२०२२
Leave a Reply