सांगा, कसे व्यक्त व्हावे
निर्जिव भास संवेदनांचा
स्पर्शभास सारे मृगजळी
हव्यास भौतिक सुखाचा।
प्रीतभाव, व्यवहारी सारे
खेळ हा लोभी भावनांचा
सर्वत्र मुखवटेच ते बेगडी
हा अनुभव या जीवनाचा।
अनभिज्ञ, सारीच मनांतरे
नात्यातही भाव संभ्रमाचा
लोपली निकोप, निर्मलता
स्वार्थी, निष्कर्ष जीवनाचा।
भेटावेत, सज्जनी सत्य चेहरे
उमजावा सत्यार्थ मानवतेचा
हीच सुखदा सदानंदी चिरंतन
रुजावा, बीजांकुर समतेचा।
— वि. ग. सातपुते (भावकवी)
9766544908
दिनांक :- १२ – ४ – २०२२
Leave a Reply