ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे यांचा जन्म १२ फेब्रुवारीला झाला.
वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली.
नितीन ढेपे हे स्वत: वास्तुविशारद आहे. अनेक वाडय़ांच्या जागेवर अपार्टमेंटची निर्मिती केल्यानंतर सदनिकेच्या किल्ल्या लोकांना देत असताना आपण वाडा या संस्कृतीपासून दूर जात आहोत याची खंत त्यांना सतत जाणवत होती. महाराष्ट्रातील पारंपरिक वाडा संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशातून ढेपे वाडा या वास्तूची निर्मिती केली. वाडा बांधायचा निर्णय घेतल्यावर लोकांपर्यंत पोहोचवायचा एकमेव मार्ग म्हणजे पर्यटन हाच होता! अर्थात नितीन यांची आर्थिक गुंतवणूक, वाडयाची देखभाल व पर्यटनातील मिळणारे उत्पन्न व्यस्त असेल हे मला माहीती होते पण घेतलेल्या ध्यासापुढे हे सर्व गोण होते. वाड्याचे संपूर्ण बांधकाम आपल्या निरिक्षणाखाली व्हावे हा नितीन ढेपे अट्टाहास होता कारण त्यांनी अनुभवलेल्या वाड्यांमधील सर्व बारकावे मला प्रत्यक्षात उतरवायचे होते आणि त्या निर्मितीतला परेपुर आनंद घ्यायचा होता.
थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने तसेच ह्या प्रकल्पाचे वास्तुविशारद व मराठा वास्तुशेलीचे तज्ञ डॉ. अविनाश सोवनी यांच्या बहुमोल मार्गदर्शनामुळे आणि सर्व सहकाग्रांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक अडचणींवर मात करत ते स्वप्न पूर्ण करु शकलो.
नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत. हा बहुमान मिळवणारी ही भारतातील पहिली पारंपरिक वास्तू ठरली आहे. देश विदेशातील अनेक अतिथी इथल्या वास्तव्याची अनुभूती घेत असून साखरपुडा, लग्न, इत्यादी कोर्टूंबिक कार्यक्रम वविवीध सण देखील इथे साजरे होतात. हल्ली ढेपे वाडा हा सेलिब्रेटींचे लग्न सोहळ्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. विवीध कला, संस्कृती व चांगल्या परंपरा जपण्याचे काम ही वास्तू करत असल्याने मराठी संस्कृतीचा एक अनमोल वारसा ठरली आहे !
त्यांच्या https://www.dhepewada.com/ या संकेतस्थळाला गेल्या चार वर्षांत जगभरातून जवळपास ७५ लाख हून अधिक लोकांनी भेट दिलीआहे.
— संजीव वेलणकर.
छायाचित्र सौजन्य: Practo.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply